Pakistan vs Afghanistan, World Cup 2023: २०२३ मध्ये एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील पॉवरप्लेमध्ये षटकार न मारल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाची खूप खिल्ली उडवली जात होती. वर्ष २०२३ संपत असताना पाकिस्तानला त्याचा खरा अर्थ समजला का? असे काही चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनीही बाबर आझमच्या संघावर टीका केली. पाकिस्तान संघाने आता आपली मानहानी करून घेतली आहे. पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यात पॉवरप्लेमध्ये ११६८ चेंडूंत षटकार ठोकला आहे. सलामीवीर अब्दुल्ला शफीकने सोमवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान विश्वचषक २०२३ सामन्यादरम्यान पॉवरप्लेमध्ये दोन षटकार ठोकले.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. नवीन-उल-हकने टाकलेल्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शफीकने चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. यंदाच्या पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानचा हा पहिला षटकार होता. त्यानंतर आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शफिकने षटकार ठोकला. हे षटक मुजीब-उर-रहमानने टाकले. उल्लेखनीय आहे की २०२३ पर्यंत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. भारताने ४६ षटकार मारले आहेत.

२०२३ मध्ये वन डे पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ

४६ – भारत

३४ – ऑस्ट्रेलिया

१९ – दक्षिण आफ्रिका

१६ – इंग्लंड

१४ – श्रीलंका

११ – रोहित वगळता भारत

११ – नेदरलँड

१० – बांगलादेश

१० – न्यूझीलंड

९ – अफगाणिस्तान

२- पाकिस्तान

सामन्याबद्दल बोलताना शफीकने पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. त्याने इमाम-उल-हकसोबत पहिल्या विकेटसाठी ५६ धावा जोडल्या. इमामचा डाव ११व्या षटकात संपला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने नवीन-उल-हकच्या हाती झेलबाद केले. शफिकने कर्णधार बाबर आझमसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली.ही भागीदारी नूर अहमदने २३ षटकात शफीकला बाद करून मोडली. तो यष्टिचीत (LBW) झाला होता. शफिकने ७५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. त्याचे वन डे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉवर प्ले मध्ये पाकिस्तान का षटकार मारत नाही यावर इमाम-उल-हकने केले मोठे विधान

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने शेवटचे दोन सामने एकतर्फी गमावले आहेत. अहमदाबादमध्ये भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला, तर बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी खेळाडूंना षटकार मारण्यात यश येत नाही हे खूप दुर्देवी असल्याची टीका सातत्याने होत होती. पाकिस्तानी खेळाडूंना हे का जमत नाही यामागील मजेशीर कारण इमाम-उल-हकने दिलं आहे. तो म्हणाला की, “अधिक षटकार मारण्यासाठी आम्हा सर्वांना कार्बोहायड्रेट खाण्याऐवजी अधिक प्रथिने खाणे सुरू करावे लागेल.”