बाबर आझमच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत जागतिक संघावर २० धावांनी विजय मिळवला. बाबरच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १९७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना जागतिक संघाला १७७ धावांवर समाधान मानावे लागले. या विजयासह तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक संघाने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नसली, तरी बाबरने ५२ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारत पाकिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बाबरला यावेळी शोएब मलिकने चांगली साथ दिली. मलिकने २० चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३८ धावा केल्या.

पाकिस्तानच्या १९८ धावांचा पाठलाग करताना जागतिक संघाला समर्थपणे फलंदाजी करता आली नाही. त्यांच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर राहून मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. असातत्य फलंदाजीमुळे जागतिक संघाला १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना सामना गमवावा लागला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १९७ (बाबर आझम ८६, शोएब मलिक ३८; थिसारा परेरा २/५१) विजयी वि. जागतिक संघ : २० षटकांत ७ बाद १७७ (फॅफ डय़ू प्लेसिस २९; सोहेल खान २/२८). सामनावीर : बाबर आझम.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan defeat world xi
First published on: 13-09-2017 at 02:49 IST