New Zealand Vs Sri Lanka Match Updates: १० नोव्हेंबरपर्यंत बंगळुरूच्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने हवामान खात्याने सोमवारपासून येलो अलर्ट जारी केला आहे. बंगळुरूच्या काही भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात पाणी साचले होते. अशातच आता चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक २०२३ सामना पावसाने प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. दिवसभरात चार वेळा वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आल्याने आता ऐन सामन्याच्या वेळी पाऊस पडल्यास काय होणार याविषयी प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये देशातील सर्व क्रिकेट मैदानांपैकी सर्वात उत्तम ड्रेनेज सुविधा आहे. म्हणजेच जरी पाऊस झाला तरी अर्ध्या तासात स्थिती नियंत्रणात येऊ शकते. परंतु जर सलग व मुसळधार पाऊस असेल तर सामना होणे कठीण आहे. परिणामी हा सामना वॉशआउट झाल्यास, विश्वचषकातील गुणतालिकेत महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येऊ शकतात.

NZ vs SL वॉशआउट झाल्यास काय होईल?

आजचा सामना वॉश आउट झाल्यास न्यूझीलंड आणि श्रीलंका दोघांनाही पॉइंट वाटून दिले जातील. यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात ९ गुण असतील तर श्रीलंका ५ गुणांवर पोहचेल. यामुळे श्रीलंकेला विश्वचषक उपांत्य फेरीत जाण्याची संधी गमवावी लागू शकते. परंतु फक्त श्रीलंकाच नव्हे तर याचा फटका न्यूझीलंडला सुद्धा बसू शकतो, कारण नऊच पॉईंट असल्याने न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता कमी होऊ शकते.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाने सलग चार विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली परंतु त्यानंतर त्यांना अनेक पराभव पत्करावे लागले. त्यांना १० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्याची गरज आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसाने धुव्वा उडवला तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सुवर्ण संधी मिळेल. पाकिस्तानचे सध्या ८ सामन्यांत ८ गुण झाले असून रविवारी त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. जर त्यांनी गतविजेत्याला पराभूत केले, तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. चौथ्या स्थानी असलेला संघ उपांत्य फेरीत भारताविरुद्ध लढणार आहे.

हे ही वाचा<< “मी कोहलीशी जास्त बोलत नाही, तो आता..”, युवराज सिंगने ‘विराट’ व ‘चिकू’ मधील अंतर सांगत केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अफगाणिस्तानला सुद्धा दक्षिण आफ्रिकेला हरवून पुढे जाण्याची संधी मिळू शकते पण त्यांच्यासाठी नेट रन रेट हा मुख्य मुद्दा ठरू शकतो.जर दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात अधिक धावांच्या फरकाने अफगाणिस्तान संघ विजयी झाला तरीही पाकिस्तान नेट रन रेटचा फायदा होऊ शकतो.