scorecardresearch

पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी मालिका:कॉन्वेच्या शतकानंतर पाकिस्तानचे पुनरागमन

डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या शतकामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या दोन सत्रांत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते.

पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटी मालिका:कॉन्वेच्या शतकानंतर पाकिस्तानचे पुनरागमन

कराची : डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या शतकामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या दोन सत्रांत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते. मात्र, तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. त्यामुळे एकवेळ १ बाद २३४ अशा सुस्थितीत असणाऱ्या न्यूझीलंडची पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०९ अशी धावसंख्या होती.

कराची येथे होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर कॉन्वे (१९१ चेंडूंत १२२ धावा) आणि टॉम लॅथम (१०० चेंडूंत ७१) यांनी १३४ धावांची सलामी दिली. अखेर नसीम शहाने लॅथमला बाद करत ही जोडी फोडली. तर फिरकीपटू आगा सलमानने कॉन्वेला माघारी पाठवले. त्यानंतर
न्यूझीलंडने अखेरच्या सत्रात ८३ धावांत पाच गडी गमावले. पाकिस्तानच्या आगा सलमान (३/५५) व नसीम शहा (२/४४) यांनी चांगली गोलंदाजी केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 03:43 IST

संबंधित बातम्या