पाकिस्तानातील फुटबॉल फारच रसातळाला गेले आहे. पण तरीही ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या फिफा विश्वचषकात पाकिस्तानची प्रमूख भूमिका असणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात चीनमधील अदिदास कंपनी अपयशी ठरल्यामुळे चेंडूंची मागणी पूर्ण करण्यासाठी सियालकोटमधील एक कंपनी पुढे सरसावली आहे.
सियालकोटमधील या कंपनीने चेंडू पुरवण्याचे कंत्राट मिळवले आहे. जर्मन बुंडेसलीगा, फ्रेंच लीग आणि चॅम्पियन्स लीगसाठी चेंडू बनविणाऱ्या या कंपनीचे मालक ख्वाजा अख्तर यांनी फिफा विश्वचषकाचा एक भाग होण्याचे हे आव्हान पेलले आहे. ‘‘२००६च्या फिफा विश्वचषकादरम्यान मी रस्त्यांवरून फिरत होतो, त्याच वेळी या स्पर्धेसाठी एक ना, एक दिवस तरी मी चेंडू पुरवेन, असे स्वप्न बाळगले होते. आता ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,’’ असे अख्तर यांनी सांगितले. सियालकोटमधून दरवर्षी ३० दशलक्ष चेंडू पुरवले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan to produce fifa world cup balls
First published on: 22-05-2014 at 05:43 IST