Pakistan vs Bangladesh Highlights, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मधील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यासह आता भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच २८ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
Asia Cup, 2025
Pakistan
135/8 (20.0)
Bangladesh
124/9 (20.0)
Match Ended ( Day – Super Four – Match 5 )
Pakistan beat Bangladesh by 11 runs
Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Highlights: आशिया चषक २०२५ पाकिस्तान वि. बांगलादेश सामन्याचे हायलाईट्स
पाकिस्तानने बांगलादेशवर ११ धावांनी दणदणीत विजय मिळवत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह ४१ वर्षांत पहिल्यांदाच भारत पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी १३६ धावांंचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ फक्त १२४ धावाच करू शकला.
पहिल्या चेंडूवर दुखापत झाल्यानंतर हारिस रौफने पुढच्या दुसऱ्या चेंडूवर तंजीमला क्लीन बोल्ड करत संघाला विकेट मिळवून दिली आहे. यासह पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. तर चौथ्या चेंडूवर तस्किन अहमदला क्लीन बोल्ड केलं.
PAK vs BAN Live Score Asia Cup: हारिस रौफला दुखापत
१८व्या षटकात हरिस रौफ गोलंदाजीला आला, पण पहिल्याच चेंडूच्या फॉलो थ्रूमध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओने मैदानावर येत त्याला तपासलं आणि त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.
बांगलादेशचा कर्णधार जाकेर अलीला सईम अयुबने झेलबाद करवत बांगलादेशच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरलं आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जाकेर अलीने आपली विकेट गमावली आहे.
PAK vs BAN Live Score Asia Cup: पाकिस्तानला पाचवा धक्का
सईम अयुबने पाकिस्तानला पाचवी विकेट मिळवून दिली आहे. १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नुरूल हसन मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यासह पाकिस्तानची सामन्यावरील पकड अजून घट्ट झाली आहे. यासह ४८ चेंडूत ७२ धावांची बांगलादेशला गरज आहे.
PAK vs BAN Asia Cup Live: चौथी विकेट
मोहम्मद नवाजने पाकिस्तानला चौथी विकेट मिळवून दिली आहे. पाकिस्तानने पॉवरप्लेनंतर फिरकी गोलंदाजांना गोलंदाजीची जबाबदारी दिली. त्यानंतर नवाजने संघाला विकेट मिळवून दिली आहे. यासह १० षटकांनंतर बागंलादेशचा संघ ४ बाद ५८ धावांवर खेळत आहे.
बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३६ धावा केल्या आहेत. यासह बांगलादेशला विजयासाठी ८५ चेंडूत अजूनही १०० धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. पॉवरप्लेमध्ये ३ मोठ्या विकेट घेत पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केलं आहे.
बांगलादेशचा महत्त्वाचा फलंदाज सैफ हसन हारिस रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सैफने गेल्या सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतकं केली होती. यासह बांगलादेशने ५ षटकांत ३ विकेट्स गमावले आहेत. सैफच्या विकेटसह पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केलं आहे.
Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Live Cricket Score: तौहिद ह्रदय झेलबाद
शाहीन आफ्रिदीच्या पाचव्या षटकात बांगलादेशचे फलंदाज सैफ आणि तौहिद एकाचवेळी स्ट्राईक एन्डला पोहोचले, पण तरीही पाकिस्तानचे खेळाडू धावबाद करू शकले नाहीत. विचित्र धावबादनंतर वाचल्यानंतर तौहिद पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
PAK vs BAN Asia Cup Live: बांगलादेशला पहिला धक्का
बांगलादेशला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर इमॉन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. मोहम्मद नवाजने धावत येत कमालीचा झेल टिपला. यासह पहिल्याच षटकात बांगलादेशचा संघ १ धावा करू शकला.
पाकिस्तानने अखेरच्या ३० चेंडूत ५२ धावा करत अखेरपर्यंत चांगली धावसंख्या उभारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १३४ धावा केल्या. पाकिस्तानची सुरूवात फारशी चांगली झाली नाही, पण अखेरच्या काही षटकांत नवाज-हारिसने चांगली फलंदाजी केली. यासह पाकिस्तानने बांगलादेशला अंतिम सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी १३५ धावांचं आव्हान दिलं आहे.
Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Live Cricket Score: हारिस-नवाजची जोडी माघारी
मेहदी हसनच्या १८व्या षटकात सरळ फटका खेळताना मोहम्मद हारिस झेलबाद झाला. ज्याने ३१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तर पुढच्याच षटकात तस्किनने मोहम्मद नवाजला झेलबाद केलं. परवेज हुसैन इमॉनने एक कमालीचा झेल टिपत महत्त्वाचा झेल टिपला. यासह पाकिस्तानने १९ षटकांत ८ विकेट्स गमावत १२४ धावा केल्या आहेत.
Pakistan and Bangladesh Live Score Updates: शाहीन आफ्रिदी माघारी
पाकिस्तानने ८० धावांच्या आत सहावी विकेट गमावली आहे. तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शाहीन आफ्रिदी झेलबाद झाला. आफ्रिदीने १३ चेंडूत २ षटकारांसह १९ धावा केल्या. यासह पाकिस्तानने १५ षटकांत ६ विकेट्स गमावत ८३ धावा केल्या.
मुस्तफिजूर रहमानच्या ११ व्या षटकात कर्णधार सलमान अली आघा २३ चेंडूत १९ धावा करत झेलबाद झाला. चेंडू आतल्या बाजूने बॅटची कड घेत यष्टीरक्षकाच्या हातात गेला, पण मैदानावरील पंचांनी झेलबाद न दिल्याने रिव्ह्यू घेण्यात आला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिलं. यासह पाकिस्तानने ११ षटकांत ५ विकेट्स गमावत फक्त ५१ धावा केल्या आहेत.
Live Score Updates Pakistan vs Bangladesh Asia Cup 2025: पाकिस्तानने ५० धावांच्या आत गमावल्या ४ विकेट्स
रिशाद हुसैनच्या गोलंदाजीवर सातव्या षटकात फखर जमान मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर नवव्या षटकात हुसैन तलातदेखील रिशादच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सैफ हसन एक उत्कृष्ट झेल टिपत संघाला चौथी विकेट मिळवून दिली. यासह पाकिस्तानने ९ षटकांत ४ विकेट्स गमावत फक्त ३७ धावा केल्या आहेत.
PAK vs BAN Live Score Asia Cup: सईम अयुब शून्यावर बाद
पाकिस्तानचा सईम अयुब आशिया चषकात चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. मेहदी हसनने दुसऱ्या षटकात सईम अयुबला झेलबाद करवत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह पाकिस्तानने दोन षटकांत २ बाद ५ धावा केल्या आहेत.
तस्किन अहमदने पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फरहानने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचला आणि पुढच्या चेंडूवर त्याने सोपा झेल यष्टीरक्षकाच्या हातात देत विकेट गमावली.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील महत्त्वाच्या सामन्याला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानकडून फरहान आणि फखरची जोडी मैदानावर उतरली आहे. तर बांगलादेशकडून तस्किन अहमद गोलंदाजी करत आहे.
Playing XI: Pakistan and Bangladesh Team Line-up: बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन
सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, जाकेर अली(कर्णधार/यष्टीरक्षक), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
Playing XI: Pakistan and Bangladesh Team Line-up: पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन
साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अयुब, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद
पाकिस्तान विरूद्ध सामन्याची नाणेफेक बांगलादेशने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास दुखापतीमुळे खेळणार नाहीये. जाकेर अली संघाचा कर्णधार असेल. पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तर बांगलादेशच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल करण्यात आले आहेत.
PAK vs BAN Live Score: करो या मरो सामना
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आशिया चषक २०२५ चा उपांत्य सामना मानला जात आहे, कारण जो संघ हा सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. त्यामुळे, दोन्ही संघांवर दबाव समान असेल.
Live Score Updates Pakistan vs Bangladesh Asia Cup 2025: बांगलादेश-पाकिस्तान हेड टू हेड
पाकिस्तान आणि बांगलादेशने आतापर्यंत २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी २० सामने पाकिस्तानने जिंकले आहेत, तर पाच सामने बांगलादेशने जिंकले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अखेरचा सामना २४ जुलै २०२५ रोजी खेळला गेला होता. तो सामनाही पाकिस्तानने जिंकला.
पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करावा लागेल आणि मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांचा प्रभावीपणे सामना करावा लागेल. सामन्यादरम्यान प्रचंड उष्णता असण्याची शक्यता आहे.
Pakistan and Bangladesh Live Score Updates: आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ
साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, सुफियान मुकीम, खुशदिल शाह, हसन नवाज.
Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Live Cricket Score: आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ
लिटन दास (कर्णधार), सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, जाकेर अली (कप्तान/कर्णधार), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसैन, तन्झिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तस्सीन हसन, तस्कीन, तस्कीन, महेदी हसन.
सूर्यकुमार यादव मोठ्या अडचणीत! ICCने स्वीकारली सूर्याविरोधातील पाकिस्तान बोर्डाची तक्रार, एका सामन्याची बंदी घालणार?
PAK vs BAN Live Updates: बांगलादेशचा कर्णधार खेळणार?
बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याला सरावादरम्यान दुखापत झाल्याने तो २४ सप्टेंबरला झालेला भारताविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. पण अंतिम सामन्याच्या दृष्टीने या महत्त्वाच्या लढतीत तो खेळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा असतील. लिटन दासच्या अनुपस्थितीत जाकेर अली संघाचा कर्णधार होता.
Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर
PAK vs BAN Asia Cup Live: भारताविरूद्ध कोण खेळणार फायनल?
आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने धडक मारली आहे. त्यामुळे आता या अंतिम सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी संघ कोण असणार, हे आज ठरणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात जणू सेमीफायनलचा सामना आज होणार असून यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल.
Asia Cup 2025 PAK vs BAN Highlights: आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.