पाकिस्तान महिला क्रिकेट महिला संघातील तीन सदस्य कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने संघाचे खेळाडू कराचीतील हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये जमले होते. बुधवारी टीममधील सर्व सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मात्र, पीसीबीने या खेळाडूंच्या नावांची माहिती दिलेली नाही, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आता १० दिवस कडक आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. क्वारंटाइन पुढील महिन्यात ६ नोव्हेंबर रोजी संपेल. कोविड-१९ प्रोटोकॉल अंतर्गत, टीमच्या उर्वरित सदस्यांना २ नोव्हेंबरपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंना प्रत्येक दिवशी एक चाचणी द्यावी लागेल. शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यात प्रत्येकाचे करोना लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा – पाकिस्तानची मोठी खेळी..! भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या ‘दिग्गजाला’ आपल्या ताफ्यात घेणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिजचा महिला संघ एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघ ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर सामने खेळवले जातील. यापूर्वी पाकिस्तानने वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळले होते. पाकिस्तानचा पुरुष संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे.