Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Proposal: भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्मृती पलाश गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि मग हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचं हे नातं लग्नाच्या पुढच्या वळणावर जात आहे. स्मृती-पलाशच्या लग्नाची तारीखही अनेक रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. यादरम्यान आता पलाशने स्मृतीला स्टेडियममध्ये प्रपोज केल्याची चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायर झालेल्या त्यांच्या लग्नाच्या कार्डनुसार, दोघेही २३ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. एका जवळच्या मैत्रिणीने शेअर केलेल्या फोटोनुसार असं दिसून येत आहे की पलाशने स्मृतीला स्टेडियममध्ये प्रपोज केलं आहे. स्मृतीच्या बोटात यानंतर रिंगही दिसत आहे.
चित्रपटसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर असलेल्या वर्षा गोगोईने तिच्या इंस्टाग्रामवर पलाश आणि स्मृतीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पलाशने कोट घातलेला दिसत आहे. तर स्मृतीने लाल रंगाचा छान वन पीस घातला आहे. याशिवाय स्मृतीच्या हातातील अंगठीने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर हा फोटो एका स्टेडियममधील आहे.
पलाश मुच्छलने स्मृतीला लग्नासाठी कुठे केलं प्रपोज?
स्मृती-पलाशचे हे फोटो पाहता पलाशने तिला स्टेडियममध्ये प्रपोज केल्याचं दिसत आहे. तर हा फोटो मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममधील असल्याचा दिसून येत आहे. त्या तिघांच्या फोटोमागे स्टेडियमचं नाव धुसर दिसत आहे. या फोटोमध्ये स्मृतीच्या हातात अंगठी आहे आणि कदाचित पलाश मुच्छलने स्मृती मानधनाला ती अंगठी डीवाय पाटील स्टेडियममध्ये घातली असावी.
चाहत्यांमध्ये सुरू असलेली प्रपोजलची ही चर्चा खरीदेखील असू शकते, कारण वर्षा गोगोईने स्मृती-पलाश मुच्छलच्या फोटोबरोबर कॅप्शनमध्येही त्यांच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. पलाश मुच्छले त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये वर्षा गोगोईची ही इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे.
स्मृती आणि पलाश २०१९ पासून एकत्र आहेत. पण, सुरूवातीला त्यांनी आपलं नातं सर्वांच्या नजरांपासून दूर ठेवलं. पलाश स्मृतीने गेल्या २ वर्षांपासून एकमेकांबरोबर फोटो शेअर करण्यास सुरूवात केली होती. स्मृती मानधनाच्या सामन्यांदरम्यान पलाश अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसला आहे. महिला प्रिमीयर लीगचे सामने असो वा स्मृतीचे आंतरराष्ट्रीय सामने असो, पलाश नेहमीच उपस्थित राहिला आहे. स्मृती तिच्या वाढदिवसांना आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असल्यास सेलिब्रेशनसाठी पलाश अनेकदा त्याठिकाणी पोहोचला आहे. याचे फोटो त्याने स्वत: अनेकदा शेअर केले आहेत.
