scorecardresearch

पार्नेलचे पुनरागमन; स्टब्सला संधी

भारत दौऱ्यावर ९ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेन पार्नेलचे पाच वर्षांनी दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन झाले आहे.

वेन पार्नेल

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

जोहान्सबर्ग : भारत दौऱ्यावर ९ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेन पार्नेलचे पाच वर्षांनी दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन झाले आहे. याचप्रमाणे धडाकेबाज फलंदाज ट्रिस्टान स्टब्सला प्रथमच संधी देण्यात आली आहे.  ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच आफ्रिकेचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असून, टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. सध्या ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या क्विंटनटन डीकॉक, एडीन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, रॅसी व्हान डर दुसेन आणि मार्को यान्सेन यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

टेम्बा बव्हुमा (कर्णधार), क्विंटनटन डीकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासीन, केशव महाराज, एडीन मार्करम, डव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्कीए, वेन पार्नेल, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, ताब्रेझ शाम्सी, ट्रिस्टान स्टब्स, रॅसी व्हान डर दुसेन, मार्को यान्सेन.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parnell return opportunity stubs south africa announced india tour ysh

ताज्या बातम्या