नीरज चोप्रा,ऑलिम्पिक पदक विजेते

निवडणुका हा लोकशाहीचा भक्कम पाया असून या प्रक्रियेद्वारे नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होतो. निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होणे हे विशेषत्वाने तरुणांचे कर्तव्य आहे.

in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
Thane, election, police, preventive action thane,
ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, ४ हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, १५५ अवैध शस्त्र जप्त
Blood collection, donation, campaign, lok sabha election 2024, code of conduct
रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

क्रीडापटू आपले समर्पण, चिकाटी आणि संघ कार्याच्या माध्यमातून देश सेवा करत असतात. देशात असो किंवा परदेशात, राष्ट्रीय रंगाचा वेश परिधान करणे हा क्रीडापटूंचा एक विशेषाधिकार आणि जबाबदारी दोन्हीही आहे. परंतु, जगातील सर्वात चैतन्यदायी लोकशाहीचा एक भाग म्हणून, तरुण भारतीय आणि क्रीडापटूच्या रूपात आम्हाला आणखी एक विशेषाधिकार मिळाला आहे, तो म्हणजे ‘मतदानाचा’.

निवडणुका हा लोकशाहीचा भक्कम पाया असून या प्रक्रियेद्वारे नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होतो. तथापि, हा अधिकार निष्क्रिय राहण्याचा नाही तर निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होणे हे विशेषत्वाने तरुणांचे कर्तव्य आहे.  ऐतिहासिकदृष्टय़ा, तरुणांनी सामाजिक बदलाचे नेतृत्व केले आहे आणि निवडणुकीत त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणीपासून ते सर्वदूर प्रचार करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

 प्रथमच मतदान करणारे नवमतदार, नवीन दृष्टिकोन तसेच पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता यासारखे आदर्श सोबत घेऊन येतात. तरुण मतदारांची ऊर्जा आणि त्यांचा तंत्रज्ञान-जाणकार स्वभाव निवडणुकीच्या वातावरणाला गतिशीलता प्रदान करतात, सोबतच  नागरिकांच्या आवश्यकते अनुरूप प्रतिसादही मिळतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबाबदार धरण्यात, समाजमाध्यमांचा वापर करून आपला आवाज बुलंद करण्यात आणि लोकांच्या समस्या प्रतिध्वनित करणाऱ्या मुद्दय़ांचे समर्थन करण्यात तरुणांची महत्त्वाची भूमिका आहे. तरुणांच्या या कृतीमुळे लोकशाहीचे महत्त्व आणि त्या प्रती असलेल्या निष्ठेची सुरक्षा करते.

महात्मा गांधी म्हणतात, ‘तुमच्या आजच्या कृतीवर तुमचे भविष्य अवलंबून आहे.’ २०२४ मध्ये, भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असण्याच्या काळात, लोकशाहीचे चक्र पुन्हा एकदा फिरत असताना, राष्ट्राचे भवितव्य घडविण्यात तरुणांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मध्ये, निवडणूक आयोगाच्या ‘मेरा पहला वोट देश के लिए’ मोहिमेवर प्रकाश टाकत, प्रथम मतदान करणाऱ्या मतदात्यांना मार्गदर्शन करताना, निवडणूक प्रक्रियेत तरुणांच्या सहभागाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला होता. तरुणांच्या उत्साहाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि मतदानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले होते. कारण तरुणांच्या सक्रिय सहभागाचा थेट परिणाम देशाच्या भविष्यावर होतो.

पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींची सामाजिक बदल घडवून आणण्यात प्रभावी भूमिका ओळखून, त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे आणि तरुण मतदारांना प्रेरित करावे, असे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत तरुणांनी केवळ राजकीय कार्यात सहभागी न होता, यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चा आणि वादविवादांची माहिती घेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकांमध्ये तरुणांचा सार्वत्रिक सुज्ञ सहभाग वाढवणे, यासाठी ‘मेरा पहला वोट देश के लिए’ हे अभियान सुरू केले आहे.  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या मोहिमेचे प्रचार गीत प्रकाशित केले. हे प्रचार गीत तरुण मतदारांना त्यांच्या लोकशाही अधिकाराचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्याच्या राष्ट्राच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तरुणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या कामात देशभरातील तरुण या गीताचा योग्य  वापर करत आहेत.

या उपक्रमांतर्गत उच्च शिक्षण संस्था, देशभरात व्यापक मतदार जागृती उपक्रम राबवत आहेत आणि वर्धित प्रातिनिधिक लोकशाहीसाठी मतदानाच्या मूल्यावर भर देत आहेत.  उच्च शिक्षण संस्थांद्वारे ( ऌएछ) प्रत्यक्ष सहभागाचे कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना सोबतच, आशय निर्मितीमध्ये सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी  ट८ॅ५ व्यासपीठावर ऑनलाइन स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये ब्लॉग लेखन, पॉडकास्ट, वादविवाद आदींचा समावेश आहे.  कार्यशाळा, चर्चासत्रे, फ्लॅश मॉब आणि मतदार प्रतिज्ञा मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना निवडणुक प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी करून घेण्याबरोबरच त्यांना शिक्षित केले जात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे ( ठरर) स्वयंसेवक आणि इतर संस्था  देखील या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.

 पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, इन्स्टाग्राम, यूटय़ूब आणि मनोरंजन विश्वासह विविध व्यासपीठावरील प्रभावक, प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांना प्रेरित करून या मोहिमेला सक्रिय समर्थन देत आहेत.  क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील ख्यातनाम मंडळींनी एकत्र येऊन हा संदेश दूरवर पोहोचवण्यासाठी एकत्र येत  आहे.

जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, अवनी लेखरा, सायखोम मीराबाई चानू यासारखे माझे क्रीडाक्षेत्रातील सहकारी तर अनिल कपूर, प्रोसेनजीत चटर्जी, रवीना टंडन, राणा दग्गुबती, कैलाश खेर, श्रेया घोषाल यासारखे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आणि रितेश अग्रवाल, बी. व्ही. आर. मोहन रेड्डी यांसारखे उद्योग विश्वातील प्रमुख आणि अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनी या मोहिमेत भाग घेऊन या मोहिमेला मतदार जागृतीची राष्ट्रीय चळवळह्ण बनवली आहे.

ही ‘लोक चळवळ’ तरुणांच्या आवाजाची सामूहिक शक्तीला आणि देशाच्या लोकशाही परिदृश्याला आकार देण्यात त्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करते.  ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि आपल्या सामूहिक आवाजाची ताकद सिद्ध करण्यासाठी आपण एकजूट होऊ या. चला, आव्हानाला सामोरे जाऊ या; चला, आपला आवाज बुलंद करू या आणि इतरांनाही असे करण्यासाठी सक्षम करूया.

 क्रीडापटूच्या रूपात आपण क्रीडांगणाचे ‘चॅम्पियन’ आहोत; पण तरुण म्हणून आपण ‘नव्या बदलाचे चॅम्पियन’ आहोत. कारण लोकशाहीच्या खेळात प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो.

नीरज चोप्रा, भारतीय ट्रॅक आणि फील्ड अ‍ॅथलीट तसेच पुरुषांच्या भालाफेकीमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक चॅम्पियन आहे. या लेखातील त्यांचे हे वैयक्तिक विचार आहेत.