Brazil Football Player Pele Died at 82: महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. कोलन कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. या महान खेळाडूच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की १९६० मध्ये पेले यांच्यामुळे एक युद्ध थांबले होते. चला जाणून घेऊया या घटनेबद्दल.

गोष्ट १९६९ सालची –

पेले यांनीन त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ सँटोस फुटबॉल क्लबमध्ये घालवला. पेले यांच्यामुळे १९६० च्या दशकात सॅंटोस फुटबॉल क्लब जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक होता. हा संघ जगभर ओळखला गेला आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये भाग घेतला. असाच एक सामना ४ फेब्रुवारी १९६९ रोजी नायजेरियातील युद्धग्रस्त भागात खेळला गेला होता. या सामन्यात सँटोसचा सामना बेनिन सिटीच्या क्लबशी झाला होता. सँटोसचा संघ २६ जानेवारी १९६९ रोजी नायजेरियाला पोहोचला. तेव्हा तेथील परिस्थिती गंभीर होती.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
bengaluru water crisis similar to Cape town
Water Crisis: बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षाही भीषण जलसंकट? कारणीभूत कोण?

नायजेरियात सुरू होते गृहयुद्ध –

तेव्हा नायजेरियात गृहयुद्ध सुरू होते. नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यात युद्ध झाले. या लढ्यात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर लाखो लोक बेघर झाले होते. दरम्यान, पेले येथे येताच नायजेरिया आणि बियाफ्रा यांच्यातील युद्ध ४८ तासांपेक्षा जास्त काळ थांबले होते. इतिहासकार गुरमन गोर्चे यांनी सांगितले की, सामन्यापूर्वी ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी संघाच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत होते. अशा स्थितीत नायजेरियातील युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सामना खेळवला जाऊ शकला. त्या सामन्यात सँटोसने बेनिन सिटीच्या क्लबचा २-१ असा पराभव केला. मात्र, या घटनेबाबत वेगवेगळ्या गोष्टीही सांगण्यात आल्या. १९७७ मध्ये पेले यांच्या पहिल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख नव्हता.

हेही वाचा – पेलेंच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा; फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंतच्या ‘या’ खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

तसेच, या घटनेचा उल्लेख ३० वर्षांनंतर आलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. देशातील बड्या अधिकाऱ्यांकडून खेळाडूंना सूचना दिल्याचे पेले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितले. मैत्रीपूर्ण सामन्यासाठी हे गृहयुद्ध संपुष्टात येऊ शकते, असे सांगण्यात आले. पेले म्हणाले, ‘या संपूर्ण घटनेत कितपत तथ्य आहे हे मला माहीत नाही, पण जोपर्यंत आम्ही तिथे आहोत, तोपर्यंत कोणतीही घुसखोरी किंवा वाद होणार नाही याची खात्री नायजेरियाने निश्चित केली होती.’

पेलेंचे सहकारी पिक्सी लीजेंड लीमा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की “युद्ध थांबवणे हा आमचा वर्चस्व दाखवण्यासाठी आमच्या बाजूने आणखी एक मुद्दा होता. आम्ही सहजपणे फिरू शकत होतो आणि म्हणू शकतो की युद्ध आमच्या सभोवताली आहे, आम्ही म्हणू शकत होतो की त्या गोंधळात का पडावे? पण आम्ही तसे केले नाही. कारण आम्हाला सामना खेळायचा होता.”

आणखी वाचा – ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा

ही कथा २००५ मध्ये टाईम मासिकात पोहोचली. मुत्सद्दी आणि राजदूतांनी गृहयुद्ध थांबवण्यासाठी दोन वर्षे निष्फळ प्रयत्न केल्याचा दावा एका प्रसिद्ध मासिकाच्या लेखात केल्यानंतर, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू पेले यांनी १९६९ मध्ये तीन दिवस चाललेले युद्ध थांबवले. मात्र, असे अनेक लेखही समोर आले, ज्यामुळे या घटनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

पेले यांचे सहकारी गिलमार आणि कौटिन्हो यांच्या मते, युद्धविराम हा सामना फारसा काळ टिकला नाही. सामना संपताच बंदुकीच्या गोळ्या झाडलेल्या ऐकू आल्या. याशिवाय नायजेरियन ब्लॉगर ओलोजो आयेगबायो यांनीही या प्रकरणावर एक अहवाल प्रकाशित केला होता, ज्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या.

हेही वाचा – दुःखद बातमी ! ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन

पेलेंची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. पेलेने त्याच्या कारकिर्दीचा बराचसा काळ (१९५६-१९७४) ब्राझिलियन क्लब सँटोसचे प्रतिनिधित्व केले. या क्लबसाठी त्यांनी ६५९ सामन्यांत ६४३ गोल केले. पेले यांची फुटबॉल कारकिर्दीची शेवटची दोन वर्षे, यूएसए मधील न्यूयॉर्क कॉसमॉससाठी खेळले. पेलेंच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने तीन वेळा (१९५८, १९६२ आणि १९७०) विश्वचषक जिंकला. तसेच कोणत्याही खेळाडूने जिंकलेले हे सर्वाधिक विश्वचषक विजेतेपद आहे.