Phil Salt Record: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने १४६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडकडून १४१ धावा करणाऱ्या फिल सॉल्टची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. यादरम्यान फिल सॉल्टने मोठे विक्रम मोडून काढले आहेत.
इंग्लंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली सर्वात मोठी खेळी
इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा याआधीही फिल सॉल्टच्या नावावर होता. याआधी त्याने ११९ धावांची खेळी केली होती. आता त्याने आपलाच विक्रम मोडून काढत १४१ धावांची खेळी केली आहे.
इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
फिल सॉल्ट – १४१ धावा
फिल सॉल्ट- ११९ धावा
अॅलेक्स हेल्स- ११६ धावा
डेविड मलान- १०३ धावा
इंग्लंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज
फिल सॉल्टने या डावात फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यासह त्याने अवघ्या ३९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे इंग्लंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेलं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. याआधी हा विक्रम स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टनच्या नावावर आहे.
यासह टी-२० क्रिकेटमध्ये फिल सॉल्टच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. फिल सॉल्ट हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आरोन फिंच अव्वल स्थानी आहे. त्याने झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात १७२ धावांची तुफानी खेळी केली होती.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
आरोन फिंच- १७२ धावा, ऑस्ट्रेलिया
हजरतुल्लाह जजई, १६२ धावा, अफगाणिस्तान
आरोन फिंच- १५६ धावा, ऑस्ट्रेलिया
सेनेवेरत्ने- १५० धावा, कॅमन
ग्लेन मॅक्सवेल- १४५ धावा, ऑस्ट्रेलिया
साहील चौहान – १४४ धावा , साइप्रस
फिल सॉल्ट- १४१ धावा, ऑस्ट्रेलिया