प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातील रोमहर्षक सामना ३६-३६ असा बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर यूपी योद्धाचा संघ २३ गुणांसह सहाव्या, तर हरयाणा स्टीलर्सचा संघ २३ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. या सामन्यात विकास कंडोलाने सर्वाधिक १७ गुणांची कमाई केली, तर सुरेंदर गिलने १४ गुणांची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणा स्टीलर्सने सामन्याची सुरुवात चांगली केली आणि यूपी योद्धाच्या तीनही प्रमुख रेडर्सना (परदीप नरवाल, श्रीकांत जाधव आणि सुरेंदर गिल) बचावात बाद केले. तथापि, यूपी योद्धाच्या बचावफळीने परदीप नरवालला पुनरुज्जीवित केले आणि तो फॉर्ममध्ये परतला आणि चढाईत गुण मिळवले. या कारणास्तव, १२ व्या मिनिटाला, यूपी योद्धाने हरयाणा स्टीलर्सला प्रथमच ऑलआऊट केले.

सामन्याच्या ३२व्या मिनिटाला दुसऱ्यांदा युपी योद्धाने हरयाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले. युपी योद्धाचे तीनही रेडर या सामन्यात उतरले. सुरेंदर नाडाने आपला हाय ५ पूर्ण केला. विकास कंडोलाने युपीच्या तीनही बचावपटूंना एकाच चढाईत बाद केले आणि दोन मिनिटे बाकी असताना यूपी योद्धा सर्वबाद झाला. विकास कंडोलानेही सुपर १० पूर्ण केला. सुरेंदर गिलने निर्णायक क्षणी दोन गुण मिळवून युपीला सामन्यात आघाडी मिळवून दिली. गिलने सुपर १० देखील पूर्ण केला. मात्र, यूपीच्या बचावफळीने खराब कामगिरी केली आणि विकास कंडोलाने याचा फायदा घेत सामना बरोबरीत सोडवला. युपीने बचावात केलेल्या चुकांमुळे त्यांना हा सामना जिंकता आला नाही.

हेही वाचा – IND vs SA : बूम बूम बुमराह! OUT SWING होण्याच्या नादात फलंदाजानं चेंडू सोडला अन्…; पाहा VIDEO

दुसऱ्या लढतीत बंगळुरू बुल्सने एकतर्फी बाजी मारत दबंग दिल्लीला धूळ चारली. बंगळुरूने ६१-२२ असा धुव्वा उडवत दिल्लीला पराभूत केले. बंगळुरूच्या पवन कुमारने २७ गुणांची कमाई करत बंगळुरूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे बंगळुरू संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

पवनने या मोसमात जबरदस्त कामगिरी करत १०० रेड पॉइंट पूर्ण केले आणि कारकिर्दीतील ८०० रेड पॉइंट्सही पूर्ण केले. त्याने मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही केली. दुसरीकडे नवीन कुमार या सामन्यात खेळला नाही आणि दबंग दिल्लीला त्याची उणीव भासली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील कोणत्याही संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl haryana steelers vs up yoddha and dabang delhi k c vs bengaluru bulls adn
First published on: 12-01-2022 at 21:45 IST