Pro Kabaddi League 2025 Final Teams: प्रो कबड्डी २०२५ च्या सीझनच्या अंतिम फेरीतील दोन संघ ठरले आहेत. प्लेऑफमध्ये दबंग दिल्लीने पुणेरी पलटनला हरवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. प्रो कबड्डीच्या प्लेऑफमध्ये ८ संघ पोहोचले होते. हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिक पँथर्स, यु मुंबा,पटना पायरेट्स, बंगळुरू बुल्स, तेलुगु टायटन्स, दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटन हे ते संघ होते. आता त्यातून दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानी असल्याने त्यांच्यात क्वालिफायरचा सामना खेळवला गेला, ज्यात दिल्लीने विजय मिळवला व फायनलमध्ये धडक मारली. हरियाणा-जयपूर सामन्यात जयपूरने विजय मिळवला. यु मुंबा वि.पटना सामन्यात पटनाने बाजी मारली. त्यानंतर पुढच्या सामन्यात जयपूरला पटनाने स्पर्धेबाहेर केलं. बंगळुरू वि. तेलुगू सामन्यात तेलुगुने विजय मिळवला. त्यानंर तेलुगु-पटना यांच्यात सामना झाला, ज्यात पटनाने बाजी मारली. यानंतर तेलुगु-पटना यांच्यात तेलुगुने बाजी मारली आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पुणेरी पलटनविरूद्ध भिडण्यासाठी सज्ज झाली.

पुणेरी पलटन वि. तेलुगु टायटन्स सामन्यात पुणेने तेलुगुने 5 पॉईंट्सने पराभूत केलं. टायटन्सचा संघ सामन्याच्या सुरूवातीपासून लीडमध्ये होता, पण पुणेरी पलटननेही कडवी झुंज दिली. दिल्लीविरूद्धचा क्वालिफायर सामन्यातील पराभव संघाच्या जिव्हारी लागला होता आणि कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकायचा या उद्देशाने पुण्याची टीम मैदानावर उतरली होती आणि संघाने बाजी मारली. पुण्याचा रेडर आदित्य शिंदेने ४ पॉईंट्सची सुपर रेड मारत पुणेला दुसऱ्या सत्रात लीड मिळवून दिली आणि हाच सामन्याचा टर्निग पॉईंट ठरला.

प्रो कबड्डी लीग २०२५ ची फायनल कोणत्या संघांमध्ये होणार?

आता पुणेरी पलटन वि. दबंग दिल्ली यांच्यात प्रो कबड्डी २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पुणेरी पलटणने गेल्या ४ सीझनमध्ये तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारण्याचा पराक्रम केला आहे. पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली यांच्यातील यंदाच्या सीझनमधील तिन्ही सामने टाय झाले आहेत. यापैकी २ सामने दिल्लीने तर एक सामना पलटनने जिंकला होता. त्यामुळे अगदी तोडीस तोड टक्कर देणारे संघ फायनलमध्ये खेळणार असल्याने सामना अधिक चुरशीचा होणार आहे. प्रो कबड्डी लीगचा अंतिम सामना ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ८ वाजता होणार आहे. हा सामना दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये होईल आणि स्टार स्पोर्ट्स व जिओ हॉटस्टार हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे.