इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पुणे येथे होणार १५ जानेवारी रोजी होणार आहे. तिकिटविक्री सुरू झाल्याच्या अवघ्या १२ दिवसांमध्येच हजारो तिकिटे विकली गेल्याचे महाराष्ट्र क्रिकेट महासंघाने म्हटले आहे. १५ डिसेंबर रोजी या तिकिटांची विक्री सुरू झाली. ऑनलाइन तसेच काउंटरवरुन सुरू झालेली ही विक्री केवळ १२ दिवस चालली.

पुण्यातील गहुंजे मैदानाची क्षमता ही ३७,४०६ इतकी आहे. तीन वर्षानंतर या ठिकाणी एकदिवसीय सामना होत असल्यामुळे इतकी तिकिटे विकली जाईल की नाही याबाबत शंकाच होती परंतु प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी होईल असे विश्वास आयोजकांना वाटत आहे.

१३ ऑक्टोबर २०१३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना झाला होता. फक्त तिकिट विक्री होणं हीच आमच्यासाठी आनंदाची बाब नाही तर भारतीय संघ भरात आहे याचा आम्हाला अत्यानंद होत असल्याचे एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी म्हटले. खूप वर्षांच्या अंतरानंतर येथे सामना होत आहे. त्यामुळे पुणेकर या सामन्यासाठी उत्साही असल्याचे ते म्हणाले.