हॉकी इंडिया लीग स्पर्धेत मुंबई मॅजिशिअन्सला अद्यापही विजयाचे मॅजिक साधता आले नाही. जेपी पंजाब वॉरिअर्स संघाने मॅजिशिअन्सवर ४-३ अशी मात केली. मुंबईने सामन्यातला पहिला गोल करत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर सातत्य दाखवता न आल्याने त्यांना सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबईचा कर्णधार संदीप सिंगने १४व्या मिनिटाला गोल करत मुंबईचे खाते उघडले. यानंतर पी.आर. श्रीजेशने स्वयंगोल केल्याने वॉरिअर्सची बोहनी झाली. चार मिनिटांनंतर मालक सिंग शानदार गोल करत पंजाबला २-१ आघाडी मिळवून दिली. एस.व्ही. सुनीलने ३९व्या मिनिटाला गोल झळकावत पंजाबची आघाडी भक्कम केली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
हॉकी इंडिया लीग : मुंबईचा सलग पाचवा पराभव
हॉकी इंडिया लीग स्पर्धेत मुंबई मॅजिशिअन्सला अद्यापही विजयाचे मॅजिक साधता आले नाही. जेपी पंजाब वॉरिअर्स संघाने मॅजिशिअन्सवर ४-३ अशी मात केली. मुंबईने सामन्यातला पहिला गोल करत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर सातत्य दाखवता न आल्याने त्यांना सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
First published on: 25-01-2013 at 05:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab hand mumbai their fifth consecutive defeat in hil