scorecardresearch

अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न

आयपीएल २०२०नंतर केला होता साखरपुडा

punjab kings batsman nicholas pooran gets married to longtime girlfriend
निकोलस पूरन आणि त्याची पत्नी अलिसा मिगुएल

आयपीएलमधील पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन विवाहबंधनात अडकला आहे. पूरन आणि त्याची पत्नी अलिसा मिगुएलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. निकोलस पूरनने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो शेअर करत आपल्या लग्नाची माहिती दिली. नोव्हेंबर २०२०मध्ये आयपीएल संपल्यानंतर दोघांनी साखरपुडा केला होता.

निकोलस पूरनने आयपीएलच्या शेवटच्या मोसमात उत्तम कामगिरी केली होती, पण या हंगामात तो चांगली कामगिरी करू शकला नाही. वेस्ट इंडिजला आता दक्षिण आफ्रिकासोबत क्रिकेट मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी पूरनने लग्नसमारंभ उरकला.

हेही वाचा – VIDEO : “आपला भाऊ तर पुरुषांमधला ढिंच्याक पूजा निघाला”

“देवाने मला या जीवनात बरेच काही दिले आहे. परंतु तुझ्या आगमनापेक्षा काही मोठे असू शकत नाही. मिस्र आणि मिसेस पूरन यांचे स्वागत आहे”, असे निकोलस पूरनने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर केला म्हटले आहे.

 

हेही वाचा – भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी!

नोव्हेंबर २०२०मध्ये निकोलस पूरनने गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलने मिगुएलला प्रपोज केले होते. यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती. निकोलस पूरन हा वेस्ट इंडिजचा प्रमुख फलंदाज आहे. तो त्याच्या वेगवान खेळीसाठी ओळखला जातो. याशिवाय तो मैदानात जबरदस्त क्षेत्ररक्षणही करतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ ( Ipl2021 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab kings batsman nicholas pooran gets married to longtime girlfriend alyssa miguel adn

ताज्या बातम्या