काल आयपीएल 2021मध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 गडी राखून विजय मिळवला. हा या स्पर्धेतील त्यांचा दुसरा विजय होता. पंजाबच्या विजयानंतर चाहत्यांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरनेही एक भन्नाट ट्विट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसीम जाफर हा पंजाब किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. मुंबईवर विजय मिळवल्यानंतर त्याने एक मीम ट्विट केले आहे. ”जेव्हा शिकार करतो, तेव्हा मोठी करतो”, असे त्याने या मीमच्या माध्यमातून म्हटले आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईचा संघ हा मातब्बर मानला जातो. या संघाने आयपीएलची पाच विजेतेपदे पटकावली आहेत. त्यामुळे सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते.

 

मुंबईच्या चाहत्यांनी दिले प्रत्युत्तर

 

 

गेल्या काही महिन्यांपासून वसीम जाफर ट्विटरवर खूप सक्रिय झाला आहे. तो अनेक मजेदार मीमही शेअर करत असतो. तत्पूर्वी, तीन सामन्यात पंजाबचा पराभव झाल्यानंतर त्याने सलमान खानचे जुने ट्विट शेअर करत वसीम जाफरने एक मीम पोस्ट केले होता. वसीम जाफरच्या नेतृत्वाखाली पंजाबची फलंदाजी गेल्या 2 मोसमांपासून उत्कृष्ट आहे. पंजाब किंग्जचा पुढील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होईल.

पंजाबची मुंबईवर मात

पॉवरप्लेमध्ये संथ खेळी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि फसलेली रणनिती यामुळे मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध ९ गड्यांनी मात खावी लागली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी रचत १७.४ षटकातच हा विजय मिळवला. राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab kings batting coach wasim jaffer shared funny memes on mumbai indians adn
First published on: 24-04-2021 at 17:56 IST