नुकत्याच झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभूत झालेल्या पी. व्ही. सिंधूची जागतिक क्रमवारीत अव्वल १० जणींमधून घसरण होऊन ती ११व्या स्थानी स्थिरावली आहे. सायना नेहवाल आठव्या स्थानी कायम आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेची विजेती शिझियान वँगने याच स्पर्धेत सिंधूवर पहिल्याच लढतीत मात केली होती. या पराभवामुळे सिंधूच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने चार स्थानांनी सुधारणा करत अव्वल २० जणांमध्ये स्थान पटकावले आहे. स्विस खुल्या स्पर्धेत उपांत्य, तर इंडिया ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्याचा फायदा कश्यपला झाला. राष्ट्रीय विजेता किदम्बी श्रीकांत २५व्या स्थानी कायम आहे. दरम्यान, पुरुष व महिला तसेच मिश्र दुहेरी प्रकारात अव्वल २५ जणांमध्ये एकाही भारतीय जोडीला स्थान मिळवता आलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
सिंधू अव्वल दहातून बाहेर
नुकत्याच झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभूत झालेल्या पी. व्ही. सिंधूची जागतिक क्रमवारीत अव्वल १० जणींमधून घसरण होऊन ती ११व्या स्थानी स्थिरावली आहे.
First published on: 11-04-2014 at 04:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu drops out of top 10 in badminton womens singles rankings