सुनचॅन : ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन आणि मालविका बनसोडचे कोरिया खुल्या (सुपर ५००) बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. परंतु पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

लक्ष्यने क्रमवारीत २४व्या क्रमांकावरील शेसार हिरेन ऱ्हुस्टाव्हिटोविरुद्ध २०-२२, ९-२१ अशी हार पत्करली. उदयोन्मुख मालविकाने थायलंडच्या पोन्रपावी चोचूवाँगकडून ८-२१, १४-२१ असा पराभव पत्करला.

सिंधूने जपानच्या अया ओहोरीवर २१-१५, २१-१० असा दमदार विजय मिळवला. जागतिक रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने इस्रायलच्या मिशा झिल्बरमनचा २१-१८, २१-६ असा पराभव केला. पुढील फेरीत सन वान हू याच्याशी श्रीकांतचा सामना होईल.

पुरुष दुहेरीत राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सिंगापूरच्या ही यंग काय टेरी आणि लो कीन हीन जोडीचे आव्हान २१-१५, २१-१९ असे मोडीत काढले. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने ५-८  असे पिछाडीवर असताना सामना अर्धवट सोडला.