चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच भारताच्या पी.व्ही.सिंधूने रशियाच्या एविग्नीया कोसेत्स्कायावर 21-13, 21-19 अशा दोन सेट्समध्ये मात केली. अवघ्या 29 मिनीटांमध्ये सिंधूने सामना संपवत सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटपासून सिंधूने आक्रमक खेळ करत एविग्नीयाला संधीच दिली नाही. पहिला सेट 21-13 ने जिंकत सिंधूने सामन्यात आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये एविग्नीयाने चांगलं पुनरागमन केलं. मात्र यावेळीही सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत 2 गुणांच्या फरकाने सेट जिंकत सामन्यात बाजी मारली. दुसरीकडे महिला दुहेरीत भारताच्या आश्विनी पोनाप्पा आणि सिकी रेड्डी जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2018 रोजी प्रकाशित
China Open Badminton : पी. व्ही. सिंधूची आगेकूच सुरु, रशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात
महिला दुहेरी जोडीचं आव्हान संपुष्टात
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 06-11-2018 at 14:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu enters second round of china open