टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. ऑलिम्पिक स्पर्धेतील तिचं हे दुसरं पदक आहे. यापूर्वी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती एकमेव खेळाडू आहे. तिच्या कामगिरीनंतर संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यात काही ब्रँडचाही समावेश होता. मात्र यात काही ब्रँड असे होते, की त्यांनी तिची परवानगी न घेता तिचं नाव आणि फोटोचा वापर केला. सिंधू या विरुद्ध दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. या ब्रँडने सोशल मीडियावर सिंधूचं नाव आणि फोटोचा वापर करून पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. मात्र हे करत असाताना ब्रँडचा प्रसार करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता.

सोशल मीडियावरील या पोस्टमुळे सामन्य लोकांना पीव्ही सिंधू आणि ब्रँडदरम्यान काही करार असल्याचं समज झाली आहे. पीव्ही सिंधू या ब्रँडचा प्रसार करत असल्याचं लोकांना वाटत आहे. याला मुव्हमेंट मार्केटिंग बोललं जातं. यापूर्वी अनेक ब्रँडने अशा प्रकारे वापर केल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र एका सेलिब्रेटीच्या परवानगीशिवाय त्याच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, हे भारतीय नियमानुसार अनफेयर ट्रेड प्रॅक्टिस आहे. यात दोषी आढळल्यास दंडाची तरतूद आहे.

ENG vs IND: …म्हणून मोहम्मद सिराज विकेट घेतल्यानंतरही करत नाहीये सेलिब्रेशन; खरं कारण आलं समोर

पीव्ही सिंधूने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २० ब्रँडविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार आहे. यापैकी १५ ब्रँडला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. फोर्ब्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, वोडाफोन आयडिया, एमजी मोटर, यूको बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्र बँक, फिनो पेमेंट्स बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि विप्रो लायटिंगसारख्या ब्रँडना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर हॅपीडेंट, पान बहार आणि यूरेकासारख्या ब्रँडना कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली आहे.