UAE creates history by defeating New Zealand: टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी न खेळणाऱ्या देशांतील खेळाडूंना संधी दिल्याबद्दल फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध युएईने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर त्याने ही टिप्पणी केली. दुबईत शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करून यूएईने किवीजविरुद्ध पहिला विजय नोंदवला. नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि १४२/८ अशी अवस्था झाली.

यूएईसाठी अयान खान ३/२० आणि मुहम्मद जवादुल्ला २/१६ यांनी शानदार गोलंदाजी केली. कर्णधार महंमद वसीम (२९ चेंडूत ५५) आणि आसिफ खान (२९ चेंडूत नाबाद ४८) यांच्या सुरेख खेळीमुळे युएईने १६व्या षटकातच लक्ष्याचा सहज पाठलाग केला. यूएईच्या या शानदार विजयावर ट्विट करत अश्विनने फ्रँचायझी लीगला श्रेय दिले की, जे देश जास्त क्रिकेट खेळत नाहीत त्यांच्या क्रिकेटपटूंना मदत केली.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून

काय म्हणाला रविचंद्रन अश्विन?

रविचंद्रन अश्विन म्हणाले, “न्यूझीलंडला हरवणे ही यूएईसाठी मोठी उपलब्धी आहे आणि याने आम्हाला फ्रँचायझी क्रिकेटचे योगदानही दाखवले. कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्यांकडून पुढच्या पिढीतील क्रिकेटपटू येतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते आणि ही खेळासाठी चांगली बातमी आहे.”

हेही वाचा – Jasprit Bumrah: आता जास्त काळ जसप्रीत बुमराहला होऊ शकणार नाही दुखापत; बॉलिंग अ‍ॅक्शनमध्ये केला ‘हा’ बदल

राशिद खानचे दिले उदाहरण –

अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानचे उदाहरण देताना रविचंद्रन अश्विन म्हणाला, “राशिद खान जेव्हा आयपीएलमध्ये आला होता, तेव्हा अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषक खेळण्याची भीती नव्हती, पण आता हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. भविष्यात इतर देशांतील खेळाडूही आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करताना आणि आपापल्या देशात खेळ पुढे नेताना दिसतील. वेल डन यूएई.”

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनी देओलने भारताला दिला महत्त्वाचा सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ साधली बरोबरी –

एवढेच नाही तर दुबईतील यजमान संघाचा हा पहिला विजय आहे. यूएईच्या या दमदार विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत आता १-१अशी बरोबरी झाली आहे. आता २० ऑगस्ट रोजी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातून मालिकेतील विजेत्याचा निर्णय होईल. तत्पूर्वी, न्यूझीलंडने मालिकेतील पहिला सामना १९ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.