Radha Yadav Catch Video: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात टी-२० मालिकेचा थरार रंगला. या मालिकेतील पाचवा टी-२० सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंना पूर्ण जोर लावला. सामना हातून निसटला, पण राधा यादवने क्षेत्ररक्षण करताना या मालिकेतील सर्वोत्तम झेल टिपला. आधी फलंदाजीत १४ धावा, गोलंदाजीत १ विकेट आणि जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तिने डाईव्ह मारत अविश्वसनीय झेल घेतला. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शेवटी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ३ चेंडूत ५ धावा करायच्या होत्या. त्यावेळी एमी जोन्सने मारलेला चेंडू हवेत गेला. झेल घेणं कठीण होतं, पण राधा यादवने धावत डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल घेतला. या झेलमुळे सामना पुन्हा एकदा बरोबरीत आला होता. भारतीय संघाला सामना जिंकण्याची संधी होती. पण शेवटी इंग्लंडने बाजी मारली आणि हा सामना आपल्या नावावर केला. सामना जरी गमावला असला, तरीदेखील भारतीय संघाने ही मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली. यासह इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकण्याचा मान पटकावला.
राधा यादवचा भन्नाट झेल
तर झाले असे की, भारतीय संघाकडून निर्णायक षटक टाकण्यासाठी अरुंधती रेड्डी गोलंदाजीला आली. अरुंधतीने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या एमी जोन्सने स्लॉग स्वीप मारला. चेंडू हवेत गेला त्यावेळी राधा यादव डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत होती. राधा धावत आली आणि तिने डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. हा झेल टिपल्यानंतर तिसऱ्या पंचांना अनेकदा खात्री करून पाहिलं. शेवटी त्यांनी बाद घोषित केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ७ गडी बाद १६७ धावा केल्या. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना शेफाली वर्माने ४१ चेंडूंचा सामना करत १४ चौकारांच्या साहाय्याने ७५ धावांची दमदार खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना डेनियल वॅट-हॉजने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर सोफिया डंकलेने ४६ आणि शेवटी टॅमी ब्यूमाँटने ३० धावांची खेळी करत इंग्लंडला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. पण भारतीय संघाने ही मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली.