आयपीएलचा आगामी हंगामाचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. मात्र भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड आयपीएलवर नाराज आहे. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन आयपीएलचे संघ चूक करत असल्याचं द्रविड म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्या मते आपल्याकडे काही चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या क्रिकेटपटूंमध्ये जशी गुणवत्ता आहे तशीच ती प्रशिक्षकांमध्येही आहे. आपण त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये आपल्या प्रशिक्षकांना संधी मिळत नाहीये हे पाहून मला खरंच वाईट वाटतं. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन संघमालक चूक करत आहेत.” राहुल द्रविड प्रसारमाध्यमांशी बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : कुलदीप यादवसाठी आगामी हंगाम महत्वाचा – संजय बांगर

दरम्यान आगामी हंगामाच्या लिलावासाठी संघमालकांनी अनेक खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे १९ तारखेला होणाऱ्या लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघात स्थान मिळवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid disappointed over indian coaches appointment in ipl psd
First published on: 29-11-2019 at 15:55 IST