एनबीएसारखी लोकप्रियता कबड्डीलाही मिळेल -भावसार

प्रो कबड्डीमुळे मराठमोळ खेळ घराघरांत पोहोचला. भारतीय कबड्डीला वेगळी उंची या लीगने मिळवून दिली

प्रो कबड्डीमुळे मराठमोळ खेळ घराघरांत पोहोचला. भारतीय कबड्डीला वेगळी उंची या लीगने मिळवून दिली आणि पुढील २० वर्षांत कबड्डीला नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीएसारखी लोकप्रियता मिळेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू राजू भावसार यांनी व्यक्त केला.

जागतिक क्रीडा पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई क्रीडा पत्रकार असोसिएशनतर्फे शनिवारी प्रेस क्लब येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी भावसार यांनी हे प्रतिपादन केले. प्रो कबड्डीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे १९९०च्या आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघातील सदस्य असलेल्या भावसार यांनी सांगितले. याचप्रमाणे ज्येष्ठ छायाचित्रकार आर्को दत्ता यांनी क्रीडाविषयक छायाचित्रणाबाबत मार्गदर्शन केले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raju bhavsar kabaddi

ताज्या बातम्या