Ranji Trophy 2025 Fan breach security for meet to Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. तो दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर रेल्वेविरुद्ध दिल्लीकडून खेळत आहे. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. एवढंच नाही तर एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून मैदानात जात विराट कोहलीच्या पायांना स्पर्श केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खरंतर, विराट कोहली शेवटचा रणजी ट्रॉफी २०१२ मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो देशांतर्गत क्रिकेटपासून दूर होता, मात्र बीसीसीआयने आता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच कारणामुळे कोहली १३ वर्षांनंतर रणजी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. कोहलीची पुन्हा एकदा फलंदाजी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. पण या सामन्यादरम्यान त्याच्या सुरक्षेतही त्रुटी आढळून आल्या. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विराटला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा –

या सामन्यात जेव्हा दिल्लीचा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा एक चाहता सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून विराट कोहलीच्या जवळ पोहोचला. त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्याचे थेट प्रक्षेपण –

विशेष म्हणजे विराट कोहलीसाठी चाहत्यांची ही आश्चर्यकारक क्रेझ पाहून बीसीसीआयनेही या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआय रणजीचे थेट प्रक्षेपण करत नाही, पण कोहलीच्या फॅन फॉलोइंगचा विचार करून बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला. या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. जिथे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर बीसीसीआयने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती की आता प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. त्यामुळे विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाला आहे.