‘बीसीसीआय’कडून २०२१-२२च्या स्थानिक स्पर्धाचे वेळापत्रक जाहीर

पीटीआय, नवी दिल्ली

स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला यंदा १६ नोव्हेंबरपासून रणजी करंडकाला प्रारंभ होणार आहे. २०२१-२२च्या स्थानिक हंगामातील सर्व प्रकारच्या स्पर्धाच्या तारखा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शनिवारी जाहीर करण्यात आल्या.

गतवर्षी करोनामुळे रणजी स्पर्धा रद्द करण्यात आला होती. यंदा मात्र २० ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेद्वारे पुरुषांच्या स्थानिक हंगामाची सुरुवात होईल. २१ सप्टेंबरपासून महिलांची एकदिवसीय लीग रंगणार आहे. इराणी, दुलीप आणि देवधर करंडकांच्या आयोजनाकडे मात्र ‘बीसीसीआय’ने दुर्लक्ष केले आहे.

स्थानिक हंगाम (पुरुष)

’ सय्यद मुश्ताक अली (ट्वेन्टी-२०) : २० ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर

’ रणजी करंडक : १६ नोव्हेंबर ते १९ फेब्रुवारी

’ विजय हजारे (एकदिवसीय) : २३ फेब्रुवारी ते २६ मार्च

स्थानिक हंगाम (महिला)

’ एकदिवसीय लीग : २१ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर

’ एकदिवसीय चॅलेंजर करंडक : २७ ते ३१ ऑक्टोबर

’ ट्वेन्टी-२० लीग : १९ मार्च ते ११ एप्रिल