IND vs ENG 1st ODI Updates in Marathi: भारत-इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लिश संघाला सर्वबाद केलं. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने जोरदार सुरूवात केली पण भारताच्या गोलंदाजीपुढे संघ संपूर्ण ५० षटकं खेळू शकला नाही. इंग्लंडने ४७.४ षटकांत २४८ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून पदार्पणवीर हर्षित राणाने दोन ३ विकेट्स तर फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजानेही ३ विकेट्स घेतले. पण जडेजाने ३ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास लिहिला आहे.

रवींद्र जडेजाने इंग्लंडविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात ९ षटकांमध्ये २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. जडेजाने यासह आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट घेणारा जडेजा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

अनिल कुंबळे – ९५३ विकेट्स, ४०१ सामने
रविचंद्रन अश्विन – ७६५ विकेट्स, २८७ सामने
हरभजन सिंग – ७०७ विकेट्स, ३६५ सामने
कपिल देव – ६८७ विकेट्स, ३५६ सामने
रवींद्र जडेजा – ६०० विकेट्स, ३५२ सामने

जडेजाने कसोटीत ३२३, वनडेत २२४ आणि टी-२०मध्ये ५४ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावा आणि ६०० विकेट घेणारा जडेजा हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्यांच्या आधी कपिल देव यांनी हा पराक्रम केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटही बऱ्याच कालावधीनंतर वनडे संघात परतला होता, पण या सामन्यात रूट काही खास करू शकला नाही. जो रूट ३१ चेंडूत केवळ १९ धावा करून बाद झाला. जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२व्यांदा जो रूटला बाद केले आहे. याशिवाय जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला ११ वेळा बाद केले आहे.