आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर, सर्व संघ सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने, विराट कोहली आणि सिंहाचा फोटो एकत्र टाकत चाहत्यांना या चित्रातला फरक ओळखण्यास सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

RCB च्या या ट्विटरवर युजवेंद्र चहलने भन्नाट कमेंट करत सर्वांनी मनं जिंकून घेतली.

आयपीएलमध्ये बंगळुरुची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत एकाही हंगामाचं विजेतेपद RCB ला पटकावता आलेलं नाही. बऱ्याचदा RCB चा संघ सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरत असतो. मात्र काही माजी खेळाडूंच्या मते यंदाची स्पर्धा UAE मध्ये होणार असल्यामुळे विराटच्या संघाला विजेतेपदाची चांगली संधी आहे.

RCB ला यंदा विजयासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे.

 

दरम्यान सरकारने स्पर्धेला अधिकृत परवानगी दिल्यानंतर बीसीसीआयने संघमालकांना पुढची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सर्व नियमांचं पालन केल्यानंतर २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएई करता रवाना होण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb ask fans to spot the difference between virat kohli and a lion chahal comes up with hilarious reply psd
First published on: 10-08-2020 at 21:31 IST