बार्सिलोनाला १-१ अशा बरोबरीवर समाधान

रिअल माद्रिद क्लबने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आगेकूच करताना पहिल्या लीग लढतीत न्युमँसिया क्लबवर ३-० असा विजय मिळवला. मात्र, ला लिगाच्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या बार्सिलोना क्लबला उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीग लढतीत केल्टा डी व्हिगोने १-१ असे बरोबरीत रोखले.

गॅरेथ बेल (३५ मि.), इस्को (८९ मि.) आणि बोर्जा मॅयोराल (९०+१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करत रिअल माद्रिदच्या विजयात हातभार लावला. बेल आणि इस्कोने पेनल्टी स्पॉट किकवर गोल केले. न्युमँसियानेही कडवी झुंज देत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, परंतु त्यांना अंतिम स्वरूप देण्यात ते अपयशी ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘दुसऱ्या सत्रात आम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागला, परंतु अखेरीस निकाल ग्रा धरला जातो. हा निकाल आमच्यासाठी फायद्याचा आहे,’’ अशी प्रतिक्रिया रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी दिली.

लिओनेल मेसी आणि लुईस सुआरेझ यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या बार्सिलोनाला विजय मिळवण्यात अपयश आले. जोस अ‍ॅर्नाइझने १५व्या मिनिटाला बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली, परंतु पिओन सिस्टोने ३१व्या मिनिटाला गोल करून केल्टा डी व्हीगोला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही क्लबना ही बरोबरीची कोंडी फोडण्यात अपयश आले.