भारताच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने खेळाचे महत्त्व सांगितले आहे. ‘खेळण्याचा अधिकार’ यावर त्याने आपले मत दिले. यावेळी त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या.

सचिन म्हणाला, ”मी सर्वांना प्रजासत्ताक दिन २०२२च्या शुभेच्छा देऊ इच्छितो. १९५०मध्ये या दिवशी आपण आपली राज्यघटना स्वीकारली. कायदे, अधिकार, अध्यादेश, असे अनेक पैलू आपल्या राज्यघटनेत आहेत, ज्यामुळे आपला देश भक्कमपणे पुढे जात आहे. पण आज मला एका वेगळ्या हक्काबद्दल बोलायचे आहे-राईट टू प्ले. संयुक्त राष्ट्रात बालकांचा हक्क म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि भारतानेही तो मान्य केला आहे.”

सचिन पुढे म्हणाला, “युनायटेड नेशन्सने देखील हे मान्य केले आहे की मुलांच्या विकासात आणि आरोग्यामध्ये खेळाची भूमिका महत्त्वाची आहे. ‘स्पोर्ट्स प्लेइंग नेशन’ यामागेही हाच विचार आहे. फक्त खेळ बघू नका, तर ते खेळा. खेळ खेळणे केवळ मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तर सर्वांसाठी फायदेशीर आहे.

हेही वाचा – ICC ODI Rankings : पाकिस्तानचा बाबर आझम पहिला नंबर सोडेना..! विराट कोहली आहे ‘या’ स्थानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि क्रिकेट समुदायातील इतर सदस्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीने ट्विटरवर लिहिले, ”प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भारतीय असल्याचा अभिमान आहे.” अष्टपैलू रवींद्र जडेजाने ट्विट केले, ”माझ्या सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशाची विविधता, चैतन्य आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे. जय हिंद.”