News Flash

सिमोन बिलेसचे विश्वविक्रमाचे स्वप्न भंगले

या प्रकारात सिमोनला १४.७३३ गुण मिळवत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

एका ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पाच सुवर्णपदके एकाही महिला जिम्नॅस्टिकपटूला पटकावता आलेली नाहीत. हा विक्रम रचण्यासाठी अमेरिकेची सिमोन बिलेस प्रयत्नशील होती. कारण आतापर्यंत तीन प्रकारांमध्ये तिने सुवर्णपदक मिळवले होते. पण ‘बॅलन्स बीम’ या प्रकारात  नेदरलँड्सच्या सॅने वेव्हर्सने बाजी मारल्याने  सिमोनचे स्वप्न भंग पावले.

या प्रकारात सिमोनला १४.७३३ गुण मिळवत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. वेव्हर्सने १५.४६६ गुण मिळवत सुवर्ण आणि अमेरिकेच्या लॉरेन हर्नाडिझने १५.३३३ गुणांसह रौप्यपदक पटकावले. १९ वर्षीय सिमोनचा २०१३ नंतरचा हा अंतिम फेरीतील पहिला पराभव आहे.

यापूर्वी सोव्हिएत रशियाची लारिसा लॅटिनिना (१९५६), झेक प्रजासत्ताकची व्हेरा कास्लाव्हसका (१९६८) आणि रोमानियाची इकाटेनिरा झाबो (१९८४) या माजी महिला जिम्नॅस्टिकपटूच्या नावावर एका ऑलिम्पिकमध्ये चार पदकांचा विक्रम आहे. सिमोनचा एक खेळप्रकार अजूनही बाकी असून यामध्ये तिने सुवर्णपदक पटकावल्यास तिला या विक्रमाशी बरोबरी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:56 am

Web Title: simone biles not create world record
Next Stories
1 Rio 2016: …आणि तिने झेप मारून जिंकले सुवर्ण!
2 Rio 2016: पी.व्ही.सिंधू रिओ ऑलिम्पिकमध्ये ‘त्या’ कोर्टवर पहिल्यांदाच खेळणार
3 नरसिंग यादवला धक्का, ‘नाडा’ने दिलेली क्लिन चीट ‘वाडा’ने फेटाळली
Just Now!
X