Indian Players To Play Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय फलंदाजांची कामगिरी पाहता खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे अनेक दिग्गजांनी सुचवलं आहे. भारताला आता चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. त्यापूर्वी भारताची फलंदाजी बाजू मजबूत होणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. रोहित शर्मा रणजी ट्रॉफीपूर्वी मुंबई संघासह सराव करताना दिसला. पण तो रणजी सामना खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. यानंतर आता भारताचा विस्फोटक फलंदाज रणजी सामना खेळणार असल्याचं त्याने क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे.

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने दिल्लीकडून पुढील रणजी ट्रॉफी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. हा सामना २३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) च्या अधिकाऱ्यांनी रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी खेळावे असे सांगितल्यानंतर काही वेळाने पंतने खेळणार असल्याचे निश्चित केले. भारतीय यष्टीरक्षक आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीचा रणजी ट्रॉफीच्या अंतिम दोन साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर

डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला रणजी सामन्यासाठी ऋषभ पंतच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली, “ऋषभ पंतने सांगितले आहे की तो राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध असेल. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी पाचही कसोटी सामने खेळलेल्या पंतची अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या टी-२० संघात निवड करण्यात आली नाही.

हेही वाचा – भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग

ऑस्ट्रेलियातील १-३ कसोटी मालिका पराभवानंतर भारताच्या कसोटी संघातील खेळाडू एकेक करून रणजी सामना खेळण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती देत आहेत. याआधी शुबमन गिल पंजाबच्या कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे निश्चित झाले होते. २७ वर्षीय पंतने सप्टेंबर २०२४ पासून भारतासाठी सर्व १० कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय त्याने हंगामाच्या सुरुवातीला दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता.

हेही वाचा – India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद

७ वर्षांनंतर पुन्हा रणजी ट्रॉफी खेळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंत २०१७-१८ च्या रणजी ट्रॉफी मध्ये अखेरचा सामना खेळला होता. डिसेंबर २०१७ मध्ये विदर्भाविरुद्ध अंतिम सामन्यात तो दिल्लीकडून खेळला होता. एलिट ग्रुप डी मध्ये दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे, पाचव्या स्थानावर असलेल्या सौराष्ट्रपेक्षा १४ गुणांनी मागे आहे. सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही मुंबईच्या पुढील सामन्यात भाग घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे.