Rishabh Pant New Video Viral : कोट्यावधी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पंतने शस्त्रक्रिया केली आणि काही वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत जाऊन पंतने फिटनेसवर विशेष लक्ष दिलं. अशातच आता पंतचा एक नवीन व्हिडीओ समोर आल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. ऋषभ पंतने त्याच्या दुखापती मात केली आहे. असं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणता येईल. पंत याआधी स्टॅंडचा आधार घेऊन चालत होता. पण आता कोणत्याही आधाराशिवाय तो स्वत:च्या पायाने चालू शकतो, कारण पंतचा टेबिल टेनिस खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चाहत्यानं म्हटलं, “भाऊ लवकर बरा हो…”

ऋषभचा अपघात झाल्यानंतर एका युजरने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, आमचा चॅम्पियन खेळाडू ऋषभ पंतचा अपघात झाला. तो लवकर बरा होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ऋषभसाठी प्रार्थना करत आहे. सुदैवाने तो अपघातात बचावला. लवकर बरा हो चॅम्प.” तसंच अन्य एका युजरने म्हटलं, ऋषभ लवकर बरा होण्यसाठी प्रार्थना करते, “गेट वेल सून चॅम्प”. भाऊ लवकर बरा हो.

नक्की वाचा – ‘आंद्रे अंदर गेंद बाहर’! पण आता मारकंडेच्या फिरकीनं समीकरणचं बदललं, ‘त्या’ चेंडूवर आंद्रे रसेलला पाठवलं तंबूत, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही तुझ्यासाठी देवाकडे साकडं घातलंय. भारतीय संघ तुझ्या पदार्पणासाठी प्रतीक्षा करतोय.” अशीही प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली होती. अपघातानंतर ऋषभ पंतने स्वत: प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी तो म्हणाला, “मी स्वत: कार चालवत होतो. कार चालवताना मला झोप लागली. त्यामुळे कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तातडीनं विंडो स्क्रीन फोडून मी बाहेर पडलो.”