संपूर्ण जग सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढत आहे. चीन, इटली, फ्रान्स यासारख्या देशांना करोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा करोनामुळे बंद पडल्या असल्या तरीही लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेले खेळाडू करोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरले आहेत. २० ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने स्वित्झर्लंडमधील गरजू व्यक्तींसाठी १० लाख Swiss Francs (अंदाजे ७.७ कोटी) मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फेडररने याविषयी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची परिस्थिती गंभीर आहे, आणि अशावेळी कोणताही गरजू व्यक्ती पाठीमागे राहता कमा नये. यासाठी मी आणि माझ्या पत्नीने सरकारी यंत्रणांना मदतनिधी म्हणून रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आमच्याकडून झालेली सुरुवात आहे, इतरांनीही यामध्ये आपला हातभार लावावा. आपण सर्व मिळून यावर मात करु, अशा शब्दांमध्ये फेडररने आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

रोनाल्डो,मेसी या फुटबॉलपटूंनीही करोनाविरुद्ध लढ्यात मदत दिलेली आहे. भारतामध्येही अनेक खेळाडू करोनाविरुद्ध लढ्यात आपली जबाबदारी बजावत आहेत. भारतासह जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यंदा टोकियो शहरात होणारं ऑलिम्पिकही २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

अवश्य वाचा – करोनाविरुद्ध लढ्यात पी.व्ही.सिंधू उतरली; मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roger federer contributes one million swiss francs to help vulnerable families psd
First published on: 26-03-2020 at 18:09 IST