Roger Federer emotional farewell tennis player Tennis fans ysh 95 | Loksatta

लेव्हर चषक टेनिस स्पर्धा : फेडररचा टेनिसला भावपूर्ण निरोप

दिग्गज टेनिसपटू आणि टेनिसरसिकांच्या ‘लाडक्या’ रॉजर फेडररने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लेव्हर चषकातील सामन्यानंतर टेनिसला भावपूर्ण निरोप दिला. 

लेव्हर चषक टेनिस स्पर्धा : फेडररचा टेनिसला भावपूर्ण निरोप
रॉजर फेडरर

वृत्तसंस्था, लंडन : दिग्गज टेनिसपटू आणि टेनिसरसिकांच्या ‘लाडक्या’ रॉजर फेडररने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लेव्हर चषकातील सामन्यानंतर टेनिसला भावपूर्ण निरोप दिला. हा दिवस, हा सामना फेडररच्या आयुष्यात येऊच नये अशी अनेकांची मनोमन इच्छा होती, पण प्रत्येकच खेळाडूच्या कारकीर्दीत तो दिवस येतोच. २० ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररसाठी हा अखेरचा सामना खूप मोठा होता. टेनिसविश्वातील त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र राफेल नदालच्या साथीने तो लेव्हर चषक स्पर्धेत दुहेरीतील अखेरची लढत खेळला. युरोप संघाकडून खेळणाऱ्या फेडरर-नदाल जोडीला जागतिक संघातील फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक जोडीकडून ६-४, ६-७ (२-७), ९-११ असा पराभव पत्करावा लागला.  आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या फेडररचा टेनिस कोर्टवरील प्रत्येक क्षण चाहते डोळय़ात साठवून ठेवत होते.

सामना संपल्यावर फेडररने प्रथम नदाल आणि नंतर प्रतिस्पर्धी जोडीला आिलगन दिले, तेव्हा त्याच्या डोळय़ाच्या कडा पाणावल्या होत्या. लंडनमधील स्थानिक वेळेनुसार सामना रात्री १२.३० वाजता संपला तरी, स्टेडियममधील प्रेक्षक जागेवरून हलले नव्हते. फेडररच्या कारकीर्दीचा आढावा घेतला जात असताना कोर्टवर बाजूला एकत्र बसलेल्या फेडरर आणि नदाल या दोघांनाही अश्रू अनावर झाले. अखेरच्या सामन्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे फेडररने लढतीपूर्वी ‘ट्विटर’च्या माध्यमातून आभार मानले होते. त्याला अखेरच्या लढतीत यश मिळाले नसले तरी, २० ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे, एकूण १०३ विजेतीपदे, सलग ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान, डेव्हिस चषक विजेतेपद, ऑलिम्पिक पदक अशा देदीप्यमान कारकीर्दीनंतर फेडररने टेनिसला अलविदा केले. 

निवृत्तीचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा तो पूर्णपणे वैयक्तिक होता. सुरुवातीला मला या निर्णयाचे दु:ख वाटले. मात्र, जेव्हा अंतिम विचार केला तेव्हा हा सर्वोत्तम निर्णय असल्याची खात्री पटली.  

– रॉजर फेडरर

रॉजर फेडररने टेनिसला अलविदा केल्याने मला माझ्या आयुष्यातील एक भागदेखील निघून गेल्यासारखे वाटत आहे. त्याच्यासह आणि त्याच्याविरुद्ध खेळताना, जे काही क्षण माझ्या आयुष्यात आले, ते सगळे महत्त्वाचे आहेत. 

– राफेल नदाल

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका :  मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य!; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात हर्षल, चहलवर नजर

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टन सुंदरने मॅट हेन्रीला झोपून लगावला अप्रतिम चौकार, पाहा व्हिडिओ
विश्लेषण: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्थलांतरित खेळाडूंचा दबदबा? कोणत्या संघात असे सर्वाधिक खेळाडू?
IND vs NZ ODI Series: न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका तुम्हाला या चॅनलवर live पाहता येणार तेही अगदी निशुल्क
IND vs NZ 2nd ODI: सामना न खेळताच संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ
Video: ‘ही’ जगातील सर्वात मोठी चूक.. विराट कोहलीने व्हायरल व्हिडीओत दिलं थेट उत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : राज्यातील पर्यटन वाढेल?
मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम
म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
अन्न व औषध प्रशासनातील ५० टक्के पदे रिक्त!; प्रतिनियुक्तीचा आयुक्तांचा प्रस्ताव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी