भारताच्या रोहन बोपण्णाने रुमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजयी सलामी केली. त्यांनी मेरिन ड्रॅगनिया (क्रोएशिया) व हेन्री कोन्तियन (फिनलंड) यांच्यावर ५-७, ७-६ (७-५), १०-६ असा रोमहर्षक विजय मिळविला. उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत बोपण्णा व मेर्जिया यांना प्रत्येक गुणाकरिता झगडावे लागले. पहिला सेट त्यांनी गमावला. मात्र त्यानंतर त्यांनी सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखून विजयश्री खेचून आणली.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2015 रोजी प्रकाशित
दुहेरीत रोहन बोपण्णाची विजयी सलामी
भारताच्या रोहन बोपण्णाने रुमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजयी सलामी केली.

First published on: 06-05-2015 at 03:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohan bopanna won the doubles opener