भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघे खेळायला मैदानात उतरले, पण मुंबईच्या मैदानावर रोहित शर्मा दणकेबाज खेळी करू शकला नाही.

क्रिकेटच्या मैदानात त्याने असं काही केलं की… स्टेडियममध्ये दोन वर्ष ‘नो एन्ट्री’

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने कव्हरच्या दिशेने चौकार मारत धावांचे खाते उघडले. त्याच षटकात रोहितने आणखी एक चौकार ठोकून आपल्या डावाची दमदार सुरूवात केली. पण पाचव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर रोहित बाद झाला. स्टार्कच्या षटकात चेंडू मारताना तो झेलबाद झाला. मिड ऑफला फटका मारताना त्याचा अंदाज चुकला. रोहितने १५ चेंडूंमध्ये १० धावा केल्या.

IND vs AUS : सचिनशी बरोबरी करण्यापासून विराट एक पाऊल दूर

घरच्या मैदानावर १० धावांची खेळी करून रोहित स्वस्तात माघारी परतला. पण तरीदेखील रोहितने एका विक्रमाला गवसणी घातली. मायदेशात ऑस्ट्रेलियाच्या संघाविरूद्ध सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरण्याचा मान रोहित शर्माला मिळाला. रोहितने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध १८ डावात हा विक्रम केला. या आधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावे होता. त्या दोघांनी १९ डावात हा पराक्रम केला होता. त्यांचा हा विक्रम रोहितने मोडला.