Rohit Sharma broke Kapil Dev embarrassing record by getting out at zero : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नकोसा विक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २५९ धावांत गार झाल्यानंतर रोहित जैस्वालसह भारताला चांगली सुरुवात करुन देईल असे वाटत होते, परंतु तो शून्यावर बाद झाल्याने त्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोदं झाली आहे. त्याने याबाबतीत कपिल देव यांनाही मागे टाकले आहे. जवळपास ९ वर्षांनी रोहित शर्मा मायदेशात कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्याला टिम साऊदीने क्लीन बोल्ड केले.

रोहित शर्माला जवळपास ९ वर्षांनी हा दिवस मायदेशात पाहावा लागला आहे. याआधी २०१५ मध्ये, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आता रोहित शर्मा भारतात कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. तो शून्यावर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. तत्पूर्वी रविचंद्र अश्विन आणि वॉशिग्टन सुंदर या फिरकीपटूनी भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी पहिल्या गुंडाळण्यात यश आले.

रोहितने कपिल देवचा लाजिरवाणा विक्रम मोडला –

एवढेच नाही तर कर्णधार म्हणून शून्यावर आऊट होण्याच्या बाबतीत रोहित शर्माने कपिल देव यांना मागे टाकले आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत तो १६ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून शून्यावर आऊट झाला आहे. सौरव गांगुली १३ वेळा आणि एमएस धोनी ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे. आता रोहित शर्मानही धोनीप्रमाणे ११ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम केला आहे. कपिल देव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १० वेळा शून्यावर आऊट झाले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: अश्विन-सुंदरची जोडी जमली रे! टीम इंडियाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिम साऊदीसमोर रोहित शर्मा पुन्हा हतबल –

ज्या गोलंदाजाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक त्रास दिला आहे, त्याच गोलंदाजाविरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा बाद झाला. आतापर्यंत टिम साऊदीने त्याला १४ वेळा बाद केले आहे. कागिसो रबाडानेही त्याला १४ वेळा बाद करण्यात यश मिळविले आहे. यानंतर बोलायचे झाले तर, श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने त्याला १० वेळा आणि नॅथन लायनने ९ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद केले आहे. त्याचबरोबर ट्रेंट बोल्टने ८ वेळा आणि पॅट कमिन्सने ७ वेळा त्याला बाद केले आहे.