रोहित शर्माचे एकापेक्षा एक भन्नाट व्हीडिओ हल्ली व्हायरल होत असतात. रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो फक्त वनडे सामने खेळताना दिसतो. तर फावल्या वेळेत तो सराव करत आपल्या फिटनेसवर काम करताना दिसतो. रोहित शर्माचे जिममध्ये असतानाचे फोटो, व्हीडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यादरम्यान रोहित शर्माने एका नवविवाहित जोडप्यासाठी खास गाण लावत त्यावर नाचताना दिसला.
सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरू आहे. यादरम्यान मुंबईतही एक जोडपं लग्नानंतर त्यांचं फोटोशूट करत होतो. त्याच इमारतीत रोहित शर्मादेखील होता. नवविवाहित दांपत्य ग्राऊंडला फोटोशूट करत होतं. यादरम्यान रोहित शर्मा पहिल्या मजल्यावरील एका खिडकीत होता.
रोहित शर्माने फोटोशूट करणाऱ्या जोडप्याला पाहताच स्पिकरवर ‘मेरे यार की शादी है’ हे गाण लावत तो नाचताना दिसला. रोहितने स्पिकरवर स्वत: हे गाण लावल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. यादरम्यान रोहित शर्माला नाचताना पाहून फोटोशूट करत असलेल्या नवऱ्याने हात जोडत हिटमॅनचे आभार मानले. तर नवरीने हा तर कमाल मोमेंट झाला असं म्हटलं.
रोहित शर्माचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्माने पुन्हा एकदा त्याच्या या व्हीडिओमधील कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. रोहित शर्मा घरच्या मैदानावर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी सराव करताना दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. यादरम्यान संघ तिन्ही फॉरमॅटमधील मालिका खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर, ३० नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरू खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांची येथे खेळवला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना ३ डिसेंबरला रायपूर येथे होईल. तिसरा एकदिवसीय सामना ६ डिसेंबर रोजी विझाग येथे खेळला जाईल.
