Rohit Sharma Diet Plan to Reduce 20 Kg weight: भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच चकित केलं आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आपल्या फिटनेसवर काम करत २० किलो वजन घटवलं आहे. रोहित शर्माचे ट्रान्सफॉर्मेशननंतरचे फोटो, व्हीडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. पण रोहित शर्माने २० किलो वजन घटवण्यासाठी त्याच्या आहारात नेमके काय बदल केले, हे जाणून घेऊया. हिटमॅनचा डाएट प्लॅन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित आयपीएल २०२५ नंतर आपल्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर सहलीला गेला होता. यानंतर भारतात परतल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. रोहितने भारताच्या कोचिंग स्टाफचा माजी सदस्य आणि त्याचा खास मित्र अभिषेक नायरसह जिममधील एक फोटोही शेअर केला होता. रोहितने अभिषेकसह आपल्या फिटनेसवर काम केलं. जिममधील त्याचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते.

आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि २०२७च्या वनडे वर्ल्डकपसाठी रोहितने जोरदार तयारी सुरू केली. त्याने ३ महिन्यांत तब्बल २० किलो वजन घटवलं. दरम्यान रिपोर्ट्सनुसार त्याने ब्रॉन्को फिटनेस टेस्टमध्ये कमालीची कामगिरी केल्याचं देखील समोर आलं.

रोहित शर्माने डाएट चार्ट आणि ट्रेनिंग सेशन फॉलो करत अभिषेक नायर आणि फिटनेस प्रोफेशनल्ससह वजन घटवलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहितने ९५ किलोवरून ७५ किलोपर्यंत काही महिन्यांत आपलं वजन कमी केलं. रोहित शर्माने ट्रेनिंग सेशनसह आहाराकडेही विशेष लक्ष दिलं. त्याने आपल्याला आवडणारे पदार्थ टाळले आणि काटेकोर डाएट पाळलं. त्यामुळेच त्याला वजन कमी करण्यात मोठी मदत झाली.

रोहित शर्माने वजन कमी करण्यासाठी कोणकोणते पदार्थ खाणं टाळलं?

रोहितला वरण भात, वडापाव, बटर चिकन, मासे, बिर्याणी आणि महाराष्ट्रीयन स्नॅक्ससारखे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात. पण वजन कमी करण्यासाठीच्या डाएटमध्ये त्याने हे सगळे नक्कीच टाळलं असणार. त्याचा आवडता पदार्थ ‘कंफर्ट फूड’ म्हणजे वरण भात असलं तरी त्या काळात कार्बोहायड्रेटचं सेवन नक्कीच कमी केलं गेलं असावं.

रोहित शर्माचा डाएट प्लॅन

सकाळी ७ वाजता – ६ भिजवलेले बदाम, मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड, फ्रेश ज्युस

सकाळी ९.३० वाजता – (नाश्ता) – ओट्स + फळं, दुधाचा ग्लास

सकाळी ११:३० वाजता – दही, चिला (बेसन/डाळीचे), नारळपाणी

दुपारी १:३० वाजता (जेवण) – भाजी, डाळ, भात, सॅलड

संध्याकाळी ४:३० वाजता – फळांची स्मूदी, सुका मेवा

रात्री ७:३० वाजता (रात्रीचं जेवण) – पनीर आणि भाज्या, पुलाव, भाज्यांचं सूप

९:३० रात्री – ग्लासभर दूध, मिक्स सुका मेवा