संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारताचा पाच गडी राखून दणदणीत विजय झाला. हार्दिक पंड्या या खेळाडूंने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारांत धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. तर भारताचे आघाडीचे फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल चांगली कामगिरी करू शकले नाहीत. या सामन्यात रोहित शर्माने समाधानकारक खेळ केला नाही. मात्र या सामन्यात तो चांगलाच जखमी होता होता वाचला. विराटने फटका मारल्यानंतर चेंडू थेट रोहितला लागला.

हेही वाचा >>> हार्दिकचीच चर्चा सर्वाधिक! पाकिस्तानला नमवल्यानंतर दिनेश कार्तिकने मैदानावरच केला पंड्याला नमस्कार

ही घटना सातव्या षटकात घडली. हे षटक पाकिस्तानचा शादाब खान टाकत होता. यावेळी रोहित शर्मा नॉन स्ट्राईक एंडवर तर विराट कोहली स्ट्राईक एंडवर होता. शादाबने षटकाचा दुसरा चेंडू टाकल्यानंतर त्याला विराट कोहलीने जोराचा फटका मारला. मात्र चेंडू थेट नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या रोहितकडे गेला. चेंडू वेगात आल्यामुळे काय करावे, हे त्याला समजले नाही. चेंडू डोक्याला लागणार होता. मात्र त्याने समोर हात केला आणि चेंडू हातावर लागला.चेंडू लागल्यामुळे रोहित शर्मा थेट मैदानावर पडला. या घटनेमध्ये रोहितला कोणताही मोठी इजा झाली नाही.

हेही वाचा >>> VIDEO: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी वसीम अक्रम यांचा संताप; मैदानावरच जाहीर केली नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा संघासाठी खास कामगिरी करू शकला नाही. त्याने १८ चेंडूमध्ये १२ धावा केल्या. मोहम्मद नवाजने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारताना तो झेलबाद झाला. तर पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने चांगला खेळ दाखवला. संघ अडचणीत आलेला असताना त्याने मोठे फटके मारत संयमी खेळ केला. त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरच भारताने पाच गडी राखून विजय मिळवला.