Rohit Sharma- Mahesh Babu In Theatre: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम केलं. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रोहितने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं होतं. कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो मैदानात उतरून क्रिकेट खेळताना दिसून आलेला नाही. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यान तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. नुकताच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पाहण्यासाठी त्याने ओव्हल मैदानावर हजेरी लावली होती. यादरम्यान तो भारतीय संघाला समर्थन करताना दिसून आला. यासह क्रिकेट चाहत्यांसोबत फोटो देखील क्लिक करताना दिसून आला.

दरम्यान सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. महेश बाबू हा आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात रोहित शर्मा झळकताना दिसतोय.

महेश बाबू हा चित्रपट सृष्टीतील मोठा अभिनेता आहे. जगभरात त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा देखील जगभरात प्रसिद्ध आहे.

या व्हिडीओद्वारे दोघांनाही मानवंदना देण्यात आली आहे. मोठ्या स्क्रीनवर आधी महेश बाबू झळकला. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरील हिटमॅनही झळकला. ज्यावेळी रोहितचा फोटो समोर आला त्यावेळी थिएटरमध्ये असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

रोहित शर्मा आता थेट ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत खेळताना दिसून येणार आहे. त्याने टी-२० क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे तो आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. तसेच या महिन्यात बांगलादेशविरूद्ध होणारी मालिका देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं पुनरागमन आणखी लांबणीवर गेलं आहे.