भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. हा सामना लखनऊमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहितने तीन फॉरमॅटचा कर्णधार झाल्याबाबत प्रतिक्रिया दिली. यासोबतच रोहितने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. भारताचा पुढचा कर्णधार कोण असू शकतो हे त्याने सांगितले.

तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होण्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होणे ही एक अद्भुत भावना आहे. मला ही संधी मिळाली आहे, याचा मला खूप आनंद आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

उपकर्णधार जसप्रीत बुमराहचा उल्लेख करताना तो म्हणाला, “गोलंदाज किंवा फलंदाज उपकर्णधार आहे की नाही याने काही फरक पडत नाही. पण हो, बुमराहकडे क्रिकेटबद्दलची हुशारी आहे. नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.”

केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल कर्णधार रोहित म्हणाला, “जर तुम्ही जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोललात, तर या लोकांना भारतीय क्रिकेटसाठी भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता आहे. त्यांना कर्णधारपदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जाते.”

हेही वाचा – IPL 2022 : नव्या इनिंगची सुरुवात..! मुंबईकर अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

युवा खेळाडूंच्या कामगिरीबद्दल रोहित म्हणाला, “तरुण खेळाडूंची चांगली कामगिरी करताना पाहून आनंद होतो. पण वरिष्ठ खेळाडूंना दुखापतींशी झुंजताना पाहणे मला आवडत नाही. ते किती कठीण असते हे मला माहीत आहे.”