Rohit Sharma Celebrates India’s Women’s World Cup Victory: भारतीय महिला क्रिकेट महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ८९ धावांच्या खेळी आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या १२५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने ३३९ धावांचं लक्ष्य गाठलं. भारताने हा सामना ५ विकेट्स आणि नऊ चेंडू राखून जिंकला. रोहित शर्माने भारताच्या या विजयावर सर्वात आधी प्रतिक्रिया दिली.
भारताच्या विजयाची स्टार जेमिमा रॉड्रिग्ज होती, तिने उपांत्य फेरीत नाबाद १२७ धावांची खेळी केली. जेमिमाने १३४ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ९४.७८ च्या स्ट्राईक रेट विजयी खेळी केली. जेमिमाने ५७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि ११५ चेंडूत शतक झळकावलं. जेमिमा हरमनप्रीत कौरने १६७ धावांची भागीदारी करत भारताच्या या शानदार विजयाचा पाया रचला.
कर्णधार हरमनप्रीत कौरनेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हरमनप्रीतने ६५ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ८९ धावा काढत फटकेबाजी केली. हरमन बाद झाल्यानंतर दीप्ती, रिचा व अमनज्योतने जेमिमाला साथ देत संघाच्या विजयात योगदान दिलं. अखेर जेमिमाने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
रोहित शर्माने महिला संघाच्या विजयावर सर्वात आधी दिली अशी प्रतिक्रिया
भारताच्या विजयानंतर लगेच रोहित शर्माने अमनज्योत कौर व जेमिमा रॉड्रीग्जच्या विजयानंतर सेलिब्रेशन करतानाचा फोटो शेअर करत टीम इंडिया शानदार कामगिरी! असं म्हणत त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.

रोहित शर्माशिवाय भारताच्या पुरूष संघाच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने फक्त विजय मिळवला नाही, तर एक विश्वविक्रमही रचला आहे. महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा भारत पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाने याच विश्वचषकात भारताविरुद्ध केला होता. हा विजय या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे, कारण ऑस्ट्रेलियाने आठ वर्षांत पहिल्यांदाच विश्वचषक सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने सलग १५ सामने जिंकले होते आणि भारताने ही विजयी मालिका थांबवली.
