Asia Cup 2023 IND vs PAK Match Highlights: २०१६ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) नाणेफेकीपूर्वी मनदीप सिंगला दुखापत झाल्यानंतर केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. राहुलने या सामन्यात अर्धशतक झळकावून स्वत:ला पहिल्यांदा सिद्ध केले होते. आणि आता गंभीर दुखापतीनंतर सहा महिन्यांनी पुन्हा मैदानात कमबॅक करताना राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी स्थान देण्यात आले होते आणि नंतर त्याने भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये केलेली कमाल आपण सर्वांनीच पाहिली आहे.
श्रेयस अय्यरला नाणेफेकीच्या काही मिनिटांपूर्वी पाठदुखीमुळे ब्लॉकबस्टर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सुपर 4 लढतीतून ब्रेक देण्याचे ठरवले. यामुळेच राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. भारताचा माजी उपकर्णधार दीर्घ दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना स्पर्धेच्या गट टप्प्यात त्याला संधी मिळाली नव्हती. सरावसत्रात श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने ही संधी राहुलकडे आली आणि शतकी खेळी करत त्याने त्या संधीचे सोने करून दाखवले. राहुल आणि कोहलीने बाबर आझमच्या संघाविरुद्ध भारतासाठी २३३ धावांची ऐतिहासिक नाबाद भागीदारी केली. कालच्या सामन्यात कोहली आणि राहुलने आशिया कपच्या इतिहासात सर्वोच्च भागीदारीची नोंद केली आहे.
पाकिस्तानवर भारताच्या विक्रमी विजयानंतर बोलताना स्वतः कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला की, नाणेफेकीच्या पाच मिनिटे आधी राहुलला संघात जागा देण्यात आली होती. विराटने उत्तम वेग पकडला होता. पण के. एल. राहुलला अक्षरशः नाणेफेकीच्या पाच मिनिटांआधी “तयार हो, तुला खेळायला जायचं आहे” असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतरही त्याने केलेला पराक्रम खेळाडूची मानसिकता दर्शवतो.
हे ही वाचा<< IND vs PAK: “भारत जिंकला तरी एका मॅचने तुम्ही पाकिस्तानला..”, शोएब अख्तरने Video मधून करून दिली आठवण
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहितने बुमराहला केवळ पाच षटके टाकण्याची परवानगी दिली. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या पाठीवर मार्चमध्ये शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर त्याने ८- १० महिने त्याने खूप मेहनत घेतली. बुमराहविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “बुमराह फक्त २७ (कदाचित ३०) वर्षांचा आहे, त्याच्यासाठी खेळ चुकवणे बरोबर नाही, परंतु त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून तो काय आहे हे दिसून आले.”