Rohit Sharma Samaira Sharma Viral Video: रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. रोहित अखेरचा आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसला होता. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान रोहित शर्मा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. हिटमॅन कुटुंबाबरोबरचे फोटो, व्हीडिओ शेअर करताना दिसतो. आज रोहित शर्माने त्याची लाडकी लेक समायराबरोबर खेळ खेळतानाचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही वनडे मालिका ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे. रोहित शर्माने पुनरागमनासाठी तयारीसाठी लागला आहे. यापूर्वी रोहितने त्याचं २० किलो वजन कमी करत आपल्या नव्या लूकने सर्वांनाच चकित केलं आहे. रोहितच्या या वजन घटवल्यानंतरच्या लूकची चांगलीच चर्चा होती.
रोहित शर्माने लेक समायराबरोबरचा गेम खेळतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये सध्या ट्रेडिंगमध्ये असलेला Don’t Spill The Water हा गेम बापलेक खेळताना दिसत आहेत. समोर एक ग्लास ठेवला आहे, ज्यात अर्धा ग्लास पाणी आहे. तर रोहित आणि समायराच्या हातात एकेक ग्लास आहेत. ज्यामध्ये पाणी आहे. तर सुरूवातीला समायरा थोडं पाणी ग्लासमध्ये ओतते तर रोहित अर्धा अधिक ग्लास भरतो, तितक्यात समायरा “एsss…” असं म्हणते. तितक्यात रितिका म्हणते, “समायरा हाच गेम आहे.”
रोहित शर्माला सॅमीने कसं हरवलं?
यानंतर समायरा आणि रोहितचा गेम सुरू होतो. तितक्यात पाणी भरत आल्यावर समायरा रोहितकडे बघून डॅडाss म्हणत त्याला चिडवत आहे. त्यानंतर रोहितनंतर समायराची पाणी टाकण्याची वेळ येताच पाणी पडणार असं रोहितला वाटलं, पण समायराने वेळ मारून नेली. हे पाहून रोहित चकित झाला. रोहितने यानंतर पाणी टाकलं, पण पाणी काही पडलं नाही. पण तितक्यात समायरा पुढे पाणी टाकायला जाणार तितक्यात पाणी खाली पडल्याचं रितिकाने सांगितलं. यासह समायरा मात्र हा खेळ जिंकली. त्यानंतर आनंदाने समायरा नाचतानाही दिसली.
समायरा जिंकताच रोहित चेहरा खाली करून बसतो. पण लेकीसाठी मात्र लाडका डॅडा खूश होतो. समायराला लाडाने सॅमी बोलतो. यानंतर उभा राहून रोहित समायराला प्रेमाने जवळ घेतो आणि जिंकल्याचं कौतुक करतो. रोहित आणि समायराचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत.