रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. टीम इंडियाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेकडून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) खेळायची आहे. यापूर्वी बीसीसीआयशी बोलताना रोहितने अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ”एक खेळाडू म्हणून लोक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही.” या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळायची आहे. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआय टीव्हीशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ”जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर नेहमीच दबाव असतो. लोक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बोलतात. पण आमचे लक्ष खेळावर कायम आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संघाला समजून घेणे. मोठ्या स्पर्धांमध्ये लोक जास्त बोलतात.”

हेही वाचा – OMG..! विराट-अनुष्काचा बॉडीगार्ड महिन्याला घेतो ‘इतका’ पगार; आकडा ऐकाल तर चाटच पडाल!

रोहित शर्माने सांगितले, ”आपल्या हातात असते ते आम्ही करतो. प्रत्येक वेळी जिंकण्याचा प्रयत्न करतो. आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो, हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंमध्ये घट्ट बंधन असायला हवे, तरच आपण लक्ष्य गाठू शकू. राहुल भाई आम्हाला नेहमीच मदत करतात.” अलीकडेच बीसीसीआयने टी-२० नंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहितकडे दिले आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून रोहितकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोहली वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या बाजूने नव्हता. रोहितने कर्णधार म्हणून चांगली सुरुवात केली आहे. भारताने टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-०ने पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma says does not pay attention to what people say adn
First published on: 13-12-2021 at 10:09 IST