Rohit Sharma Video Post on Instagram : रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याच्या पुल शॉटला जगात तोड नाही. जेव्हा रोहितला सूर गवसतो, तेव्हा त्याच्या समोर कोणत्या उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणाचा निभाव लागत नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ च्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. तो त्याच्या विनोदी शैलीसाठी देखील ओळखला जातो. आता त्याने शेअर केला खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –

बीसीसीआयने नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. तत्पूर्वी रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना चांगली फटकेबाजी करताना दिसत आहे. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात येतो, तेव्हा त्याला एक चाहता म्हणतो, ‘भाई, तुम्ही पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार का.’ यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, वेडा झाला आहेस का? यानंतर तो नेटमध्ये स्फोटक फलंदाजी करतो.

न्यूझीलंड मालिकेपूर्वी रोहितने नेटमध्ये घाळला घाम –

गेल्या काही काळापासून रोहित शर्माने खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. मैदानावर येताच तो झटपट धावा काढतो, त्यामुळे त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या फलंदाजांवरील दडपण कमी होते. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने डावाला सुरुवात करताच दोन षटकार ठोकले आणि त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी कामगिरी केली. ज्यामुळे भारतीय संघाने तीन दिवसांचा खेळ वाया गेला असताना, अवघ्या दोन दिवसात सामनाा जिंकत नवा पराक्रम केला. त्याचबरोबर घरच्या मैदानावर सलग कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी कायम ठेवली. भारताने सलग १७ मालिका जिंकल्या आहेत.

हेही वाचा – MS Dhoni : ‘तपकिरी केस, हिरवा चष्मा आणि हलकी दाढी’, माहीच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माची आतापर्यंतची कारकीर्द –

रोहित शर्मा हा गेल्या दशकापासून टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्त्वाचा दुवा आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. त्याने भारतीय संघाला अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. भारतासाठी त्याने ६१ कसोटी सामन्यांमध्ये ४१७९ धावा, २६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०८६६ धावा आणि १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण ४८ शतके आहेत.